शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेवर शिवसेना राज!

By admin | Updated: March 12, 2016 01:11 IST

बहुमताचा जोर : नगराध्यक्ष भाजपचे असूनही अल्पमतात

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीद्वारे विजय मिळवत शिवसेनेने पालिका सभागृहात स्वबळावर बहुमत मिळविले आहे. त्यामुळे सभागृहात सेनेचा दबदबा वाढला असून, १० मार्चला झालेल्या पालिका सभेत शिवसेनेने बहुमताच्या जोरावर अनेक ठराव मंजूर घेतले. भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना ‘हो’ ला ‘हो’ म्हणत ठराव मंजूर करणे भाग पडले. सेनेच्या आक्रमकतेमुळे पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असूनही शिवसेना राज असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी सेनेचे विनय मलुष्टे यांची निवड झाल्यानंतर सेनेची कीर - साळवी -मलुष्टे व राजन शेट्ये अशी आक्रमक फळी सभागृहात कार्यरत झाली आहे. २८ सदस्यांच्या नगरपरिषदेत शिवसेनेचे १५ सदस्य आहेत. प्रत्यक्षात पालिकेत भाजपचे ८ सदस्य आहेत. तरीही भाजपचे महेंद्र मयेकर हे नगराध्यक्ष आहेत. युती असताना नगराध्यक्षपद मिळाले व नंतर युती तुटली. त्यामुळेच मयेकर यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. सेनेचे बहुमत असले तरी मयेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी २१ मतांची आवश्यकता आहे. तेवढे संख्याबळ होत नसल्यानेच मयेकर यांचे नगराध्यक्षपद वाचले आहे. नगराध्यक्षपद मिळणार नसले तरी बहुमतामुळे येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईपर्यंत सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने नगराध्यक्षपद वाटपात केलेली फसवणूक सेनेच्या जिव्हारी लागली असून, त्यामुळे काहीही करून विकासाचे प्रश्न येत्या ८ महिन्यात मार्गी लावा. सभागृहातील बहुमताचा नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपयोग करा, रत्नागिरीकरांचा विश्वास संपादन करा, असे निर्देश वरिष्ठ नेत्यांनीही पालिका सभागृहातील नगरसेवकांना दिलेले असल्याने त्याचा प्रत्यय १० मार्चच्या पालिका सभेतही आला. फूड स्टॉलचे वाटप रद्द करणे, शाळेसाठी ठेवलेले परंतु मत्स्योद्योगसाठी दिलेल्या तीन भूखंडांचा करार रद्द करावा व हे भूखंड शाळेसाठीच परत घ्यावेत, असा ठरावही सेनेच्या आक्रमकतेमुळे मंजूर झाला. आठवडा बाजारमधील पालिका सुलभ शौचालयाचा १ रुपये नाममात्र भाडे आकारून ३० वर्षांसाठी केलेला करारही रद्द करण्यात सेनेला यश आले. भाजपचे ८, तर राष्ट्रवादीचे ५ सदस्य असलेल्या सभागृहात सेनेचे बहुमत भारी पडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)मोबाईल टॉवर : सभागृहातील बैठकीत सेनेची आक्रमक भूमिका...मजगाव रोडलगत क्रांतीनगरमधील इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रस्ताव नामंजूर असतानाही त्याला परवानगी दिली कोणी, असा सवाल करीत टॉवरचा विषयही सेनेने आक्रमकतेने मांडला व या टॉवरला अनवधानाने दिलेली परवानगीही रद्द करून घेतली.