शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात युतीसाठी शिवसेनेचा हात पुढे

By admin | Updated: July 18, 2016 00:02 IST

नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक

राजापूर : नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना सक्रिय झाली आहे. शनिवारी नेतेमंडळी, पदाधिकारी आणि शहरातील शिवसैनिकांसोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार राजन साळवी यांनी युती करण्यासाठी भाजपकडे हात पुढे केल्याची घोषणा केली आहे. शनिवारी झालेल्या सेनेच्या बैठकीला माजी आमदार गणपत कदम, नगरपरिषदेतील सेना-भाजपचे विद्यमान गटनेते अभय मेळेकर, शिवसेना शहरप्रमुख अनिल कुडाळी, विद्यमान नगरसेवक, शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना आमदार साळवी यांनी सांगितले की, राजापूर नगर परिषदेत सेना-भाजप युतीचा रिवाज अनेक वर्षे चालत आलेला आहे. नगर परिषदेच्या राजकारणात हे दोन्ही मित्रपक्ष आजपर्यंत एकोप्याने काम करीत आले आहेत. राजापूर शहराच्या राजकारणाला वेगळी किनार आहे. यापूर्वी सत्तेच्या काळात शहराच्या सर्वांगिण विकासाला मिळालेली चालना आता राज्यात उभय पक्ष सत्तेत असल्याने अधिक जोमाने मिळणार आहे. त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणूकदेखील युतीद्वारे लढवण्याचा शिवसेनेचा मानस आहे. युती झाल्यास मतविभागणीचा तोटा रोखला जाऊन सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा मिळणार आहे. याकरिता युती व्हावी, अशी आपली मनोमन इच्छा असून, त्यासाठी आपण मैत्रीपूर्ण हात पुढे करीत आहोत, असे साळवी यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने प्रथमच संभाव्य युतीबाबत जाहीर भूमिका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार साळवी यांनी सेना-भाजप युतीसाठी भूमिका घेतली आहे. स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची वारंवार घोषणा करणाऱ्या भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)