शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पंचायत समिती सदस्याचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

चिपळूण : चिपळूण पंचायत समिती सभापतीपदाची निवड १ एप्रिल रोजी होत असून, निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेतील असंतोष उफाळून आला. पक्षाकडून ...

चिपळूण : चिपळूण पंचायत समिती सभापतीपदाची निवड १ एप्रिल रोजी होत असून, निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेतील असंतोष उफाळून आला. पक्षाकडून विश्‍वासात घेत नसल्याने शिवसेनेतील रामपूर गणाच्या सदस्या अनुजा चव्हाण यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख त्यांना हवे तसे राजकारण करतात. पक्ष नेतृत्वाने याची दखल न घेतल्यास सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही सदस्या चव्हाण यांनी दिला आहे.

राजीनाम्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या सदस्या अनुजा चव्हाण म्हणाल्या की, प्रतिकूल स्थितीत रामपूर गणातून मी विजयी झाले. मात्र गेल्या चार वर्षांत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कधी विश्‍वासात घेतले नाही. चार वर्षांपूर्वी झालेल्या सभापती निवडीवेळी पुढच्या वेळी तुम्हाला संधी देऊ, असा शब्द नेत्यांकडून मिळाला होता. मात्र तो पाळला गेलेला नाही. त्यामुळे आपण सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजीनाम्याची माहिती पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांना राजीनाम्याची माहिती सांगितली असता, ते म्हणतात, मी तुमचा तालुकाप्रमुख नाही. तुमच्याकडील ७२ गावांचे तालुकाप्रमुख संदीप सावंत आहेत. त्यांच्याकडे राजीनामा द्या. राजीनामा का देताय हे विचारण्याची तसदीही तालुकाप्रमुख घेत नाहीत, हे पक्षातील कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे. पदाधिकारी निवडीत मातोश्रीचे आदेश आम्हाला मान्य आहेत. मात्र स्थानिक स्तरावर येथील पदाधिकारी आपल्याला हवे तसे राजकारण करतात. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार आमच्याशी संपर्क साधून मतदान अथवा सहकार्यासाठी तालुकाप्रमुखांचा फोन येईल असे सांगतात. यावरूनच सर्वकाही समजते आहे. गुरुवारी सभापती, उपसभापतीपदाची निवड होत आहे. या निवडीबाबत अद्याप तालुकाप्रमुख असो वा जिल्हाप्रमुख कोणीही संपर्क साधलेला नाही. निवडीसंदर्भात सदस्यांची संयुक्त बैठकही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदस्य नाराज असले तरी ते कारवाईच्या भीतीने थेट नाराजी व्यक्त करीत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख स्वतःला सोयीचे राजकारण करतात. ते विश्‍वासात घेत नाहीत. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे अनुजा चव्हाण यांनी सांगितले. प्रभारी सभापती पाडुरंग माळी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. दखल घेतली तर सभापती निवडणुकीत सहभागी होऊ, अन्यथा त्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

हे आहेत आक्षेप

जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आपल्याला हवे ते करतात

सदस्यांना विश्वासात घेतलेच जात नाही

सभापती निवडीबाबत सदस्यांची बैठकही लावली नाही