शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

शिवसेना, राष्ट्रवादीचा नगराध्यक्षांना दणका

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

रत्नागिरी नगरपरिषद सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब

रत्नागिरी : शहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य, बंद पडलेले पथदीप, शहराबाहेर दिलेल्या पाणी जोडण्या यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची बुधवारी कोंडी केली. २० सदस्यांच्या प्रखर विरोधापुढे अखेर नगराध्यक्षांना झुकावे लागले. त्यामुळे बुधवारची सभा १५ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. ही सभा आता १६ सप्टेंबरला होणार आहे.नगर परिषदेच्या बुधवारच्या सभेत शून्य प्रहरात सेना, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शहरात कचऱ्याचे ढीग असून, दुर्गंधी पसरली आहे. असंख्य पथदीप बंद आहेत. भर पावसाळ्यातही शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहराला पाणी पुरविणारे शीळ धरण व पानवल धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. हे प्रश्न गंभीर बनलेले असताना नगराध्यक्ष मयेकर यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षांना मंगळागौर कार्यक्रमासाठी वेळ आहे, मात्र मूलभूत प्रश्नच ते विसरले आहेत, असा हल्लाबोल सेनेचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी केला. मिलिंद कीर, उमेश शेट्ये यांनी पाणीप्रश्नावर झोड उठविली. शहराबाहेर तिवंडेवाडीतील साडेचारशे सदनिका असलेल्या गृहसंकुलास नगरपरिषदेने दिलेली पाणी जोडणी रद्द करण्याची मागणी नगरसेवक राहुल पंडित यांनी केली.अनधिकृत नळ जोडण्या रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी केली. हद्दीबाहेरील शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात दिलेल्या नळ जोडण्या रद्द करा, पऱ्याच्या आळीतील इमारतीच्या बेसमेंटमध्ये ६ फूट पाणी भरूनही त्याबाबत कारवाई का नाही, असे सवाल करीत भाजपचे नगरसेवक अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला. शहरातील या समस्या गंभीर वळणावर आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक प्रथम करावी व नंतरच सभा घ्यावी. तोपर्यंत सभा तहकूब करावी. पक्षाचे नगरसेवक सभेसाठी सहकार्य करणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या १५, तर राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी घेतली होती. तशी स्वतंत्र पत्रही दोन्ही पक्षांतर्फे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात आली होती. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. प्रखर विरोधामुळे सभा तहकूब करावी लागली. (प्रतिनिधी)