रत्नागिरी : शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत रत्नागिरी तालुका पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
शिव सहकारच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना सहकाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात व सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि आर्थिकदृष्ट्या बळकट बनविण्यास त्यांना मदत करावी, अशा सूचना अध्यक्षा सरपोतदार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला शिव सहकार सेनेचे महाराष्ट्राचे सचिव संदीप तांबे, सहखजिनदार वनिता देशमुख, रत्नागिरी जिल्हा संघटक गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क संघटक विलास पोतेरे, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा संघटक संदीप माड्ये, रत्नागिरी तालुका संघटक सुनील नावले, लांजा तालुका संघटक चंद्रकांत शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शिव सहकार सेनेच्या रत्नागिरीतील जयगड-वाटद विभागाचे आदेश सुरेश खाडे यांची तालुका सचिवपदी, उपविभागपदी भरत भुवड, कोतवडे उपविभाग संघटकपदी सुनील लोगडे, विद्याधर तांदळे, संदीप कांबळे, दीपक डांगे, अभिजित वैद्य यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.