शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांबाबतीत संवेदनशीलता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 23:52 IST

विभा विरकर : बाल न्याय अधिनियम जनजागृती चर्चासत्र

ओरोस : आपले पद हे स्वत:साठी नसून मतदारांसाठी आहे. आज मी सदैव कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, कोकणचा विकास केवळ घोषणांनी होणार नाही, तर घोषणांची स्वप्ने सत्यात उतरावी लागतात. त्यासाठी सुलभता येण्याची गरज असल्याचे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. श्री सिद्धिविनायक मंदिर सभागृह लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, कसाल सरपंच नीलिमा पारकर, शिवसेना विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत बालम, बाळा कांदळकर, पंकज परब, बळिराम परब, नागेश आरोसकर व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. सूर्यकांत बालम म्हणाले की, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून गेली ३३ वर्षे विविध कार्यक्रम राबवत आहे. मात्र, या ठिकाणी व्यासपीठ नव्हते. मागील वर्षी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या व आमदार नाईक यांच्यासह औरंगाबादचे खासदार राजकुमार धुत यांच्या फंडातून एकूण २० लाखांची तरतूद करून दिली. त्यानुसार हे सभागृह पूर्ण झाले असून त्याचा आज प्रारंभ होत आहे. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, शब्द देणे व त्याची पूर्तता करणे अवघड नाही, पण दिलेल्या निधीचा उपयोग योग्यरीतीने होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. औरंगाबादचे खासदार राजकुमार धुत यांच्या निधीतून येथील जनतेने सुसज्ज सभागृह बांधून घेतले आहे. असे सांगताना कोकणचा विकास केवळ घोषणांनी होणार नाही तर त्यासाठी घोषणांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोकणात सुबत्ता आल्यास विकास झपाट्याने होईल. सूत्रसंचालन बाळा कांदळकर, आभार अवधूत मालणकरांनी केले. (वार्ताहर)पारकरांचा टोला -कोकणच्या विकासासाठी शब्द देणारे व तो शब्द पाळणारे खासदार विनायक राऊतच आहेत. अनेकांनी विविध आश्वासने दिली, परंतु केवळ विनायक राऊत यांनीच वर्षभराच्या कालावधीत दिलेला शब्द पूर्ण केला, असे सांगत शब्द देणारे अनेक आहेत, परंतु पाळणार केवळ शिवसेनाच, असाही टोला कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाव न घेता संदेश पारकर यांनी लगावला.कसाल रेल्वेस्थानक मंजूरदिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद असून, आपण कसालवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून घेत कसाल पंचक्रोशीसाठी कसाल येथे रेल्वेस्थानक मंजूर करू न घेतले आहे. त्यामुळे येथे लवकरच रेल्वेस्थानक उभे राहणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. विकासकामांसाठी संपर्क साधाआमदार वैभव नाईक म्हणाले की, खासदारसाहेब दिलेला शब्द पूर्ण करीत आहेत आणि करत राहणार. आपण कसालवासीयांना आवश्यक असलेली हायमास्टलाईट उपलब्ध करून दिली आहे. कसाल मतदारसंघात ४२ रस्ते दिले. त्याचप्रमाणे काही विकासकामांची गरज असल्यास संपर्क साधा, असे त्यांनी सांगितले.