शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना जोशी हरपले

By admin | Updated: June 4, 2017 01:38 IST

राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील अजोड व्यक्तिमत्त्व हरपले.

चिपळूण : कोकणचे बुध्दीवैभव म्हणून गणले जाणारे माजी आमदार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे आज (शनिवारी) दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील एक अजोड व्यक्तीमत्त्व हरपले. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुंबईत नोकरी करुन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत असताना २० जून १९६५ मध्ये दैनिक सागर हे संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर निघणारे पहिले वर्तमानपत्र सुरु केले. पत्रकारितेत विविध पुरस्कार, स"ाद्री वाहिनीचा रत्नदर्पण पुरस्कार, सोव्हिएत युनियनमधील एपीएन या शासकीय वृत्तसंस्थेकडून रशियाच्या तीन आठवड्यांच्या भेटीसाठी पत्रकार म्हणून विशेष निमंत्रण, मास्को महापालिकेतर्फे सत्कार असा अनेक ठिकाणी त्यांचा गौरव झाला आहे. नुकताच त्यांना एक्सलन्स आॅफ कोकण अ‍ॅवॉर्ड सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता. १९८५ मध्ये ते चिपळूणमधून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा संचालक, महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजना कार्यकारिणी सदस्य, राज्य सरकारच्या कोकण सिंचन अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. कोकण सांस्कृतिक अकादमीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. साहित्य संमेलन व नाट्य संमेलनाचे संयोजन त्यांनी केले आहे. १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत महोत्सवाचे संयोजन त्यांनी केले होते. राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती, राज्य व केंद्र सरकारच्या डब्ल्युटीओ समिती, निसर्ग संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य असताना त्यांनी देशातील २६ राज्यांना भेटी दिल्या.