रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे येथील ज्येष्ठ नेते जनुभाऊ तथा जनार्दन नारायण काळे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृध्दत्वाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मिरकरवाडा स्मशानभूमीत रात्री ९ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते. जनुभाऊ काळे यांच्या पश्चात पत्नी व तीन पुतण्या असा परिवार आहे.रत्नागिरी जिल्हा भाजप उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा अनेक संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले होते. १९७७मध्ये आणीबाणीच्या काळात जनुभाऊ काळे हे १७ महिने तुरुंगात होते. भाजप नेते प्रमोद महाजन, प्रेमजीभाई असर, डॉ. तात्या नातू, कुसुमताई अभ्यंकर, शिवाजी गोताड, डॉ. ज. शं. केळकर, गोपीनाथ मुंडे, शरद कुलकर्णी, यशवंत माने यांसारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी पक्ष संघटनेचे काम पाहिले होते.राज्यात सेना - भाजप युतीचे सरकार असताना त्यांनी म्हाडाचे सदस्य म्हणून काम केले होते. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला व आंदोलने यशस्वी केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते जनुभाऊ काळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:14 IST
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे येथील ज्येष्ठ नेते जनुभाऊ तथा जनार्दन नारायण काळे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृध्दत्वाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मिरकरवाडा स्मशानभूमीत रात्री ९ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते. जनुभाऊ काळे यांच्या पश्चात पत्नी व तीन पुतण्या असा परिवार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते जनुभाऊ काळे यांचे निधन
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा भाजप उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा अनेक संघटनात्मक पद