शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शालेय वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड

By admin | Updated: June 14, 2016 00:23 IST

दोन दिवस शिल्लक : सहावीच्या पुस्तकांची प्रतीक्षा

रत्नागिरी : शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे शालोपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. यावर्षी इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, अद्याप पुस्तके उपलब्ध नाहीत. परंतु, पहिली ते पाचवी व सातवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर बहुतांश पालक शैक्षणिक साहित्य खरेदीला सुरुवात करतात. काही पालक शाळा सुरू होण्यापूर्वी खरेदी करतात. सुटीसाठी परगावी गेलेले पालक घरी परतले असून, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दुकानातून गर्दी होत आहे. पावसात छत्र्या, पिशव्या सांभाळत पुस्तके, वह्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येते. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके दुकानातून खरेदी करावी लागत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. नामवंत कंपन्यांच्या वह्यांना विशेष मागणी होत आहे. नवनीत, स्मार्ट, क्लासमेट कंपन्यांच्या वह्यांचा खप अधिक आहे. बहुतांश वह्यांचे पृष्ठ कव्हर ब्राऊन कलरचे आहेत. फुले अथवा प्राण्यांची चित्र असलेल्या वह्यांना मागणी होत आहे. कंपासबॉक्स, पाण्याची बाटली, टीफीन आदी प्लास्टिक साहित्य, शालेय बॅग, स्केचपेन, रंगपेट्या, कव्हर्स, स्टीकर्स यांच्या किमतीतही पाच टक्के वाढ झाली आहे. स्कूल बॅग्ज, स्टीकर्समध्ये बेनटेन, बार्बी डॉल, अ‍ॅग्रीबर्डबरोबरच शायनिंग स्टीकर्सला विशेष मागणी आहे. प्लास्टिक कोटेट कव्हर टिकाऊ असल्याने कव्हर्सची खरेदी जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)दुकाने सुरूच...रविवारी रत्नागिरी शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने व्यावसायिकांनी रविवारी दुकाने सुरू ठेवली होती. त्यामुळे पालकांनी रविवारीदेखील खर्दीसाठी गर्दी केली होती.