शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

शाळांच्या दुरुस्तीची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:29 IST

अनुदान वर्ग : नादुरूस्त ३६ प्राथमिक शाळांचा समावेश

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ३६ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आल्याने या शाळांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरु आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाकडे सर्व शिक्षा अभियानाचा ५० कोटी रुपयांपर्यंतचा वार्षिक आराखडा दरवर्षी सादर करण्यात येतो. त्यामध्ये वर्गखोल्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे बांधकाम त्यातून करण्यात येत होते. या अनुदानातून दरवर्षी सुमारे १०० ते १५० वर्गखोल्यांची कामे करण्यात येत होती. मात्र, आता या अनुदानातून वर्गखोल्यांची कामे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नादुरुस्त असलेल्या अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. जिल्ह्यात शेकडो शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. यामध्ये अनेक शाळांची छप्पर मोडकळीस आली असून, काही शाळांच्या भिंतीला तडे गेले आहेत. तरीही विद्यार्थी जीव मुठीत धरुन अध्यापनाचे धडे घेतात. मात्र, या शाळांच्या दुरुस्तीसाठी पुरेसे अनुदान नसल्याने शिक्षण विभागासमोर दुरुस्तीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शाळा दुरुस्तीसाठी शासनाच्या अनुदानावरच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अवलंबून रहावे लागते. त्यासाठी शिक्षण विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून शाळा दुरुस्तीसाठी आवश्यकतेपेक्षा फार कमी अनुदान प्राप्त झाले. शाळा दुरुस्तीसाठी आलेल्या अनुदानातून ३६ शाळांना ६० लाख रुपये वर्ग करण्यात आले. या शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक ते दोन लाख रुपये अनुदान तालुक्याला वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. (शहर वार्ताहर)प्रसंगावधान : विद्यार्थी बालंबाल बचावलेजिल्ह्यातील अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्राथमिक शाळेत छप्पराचे तुकडे खाली पडत असल्याचे शिक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका पोहचला नाही.दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या शाळा तालुकादुरुस्तीसाठीच्या शाळादापोली२मंडणगड१खेड१चिपळूण५गुहागर१संगमेश्वर८रत्नागिरी१७लांजा१एकूण३६सर्व शिक्षा अभियानाचा ५० कोटींचा वार्षिक आराखडा.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम.शाळांच्या दुरूस्तीची कामे रखडली आहेत.निधी कमीचजिल्हा परिषदेकडून वर्ग करण्यात आलेला निधी खूपच कमी आहे. शाळा दुरूस्तीसाठी ३६ शाळांना ६० लाख इतकाच निधी देण्यात आला आहे.