शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

कोकण मर्कंटाईल बँकेत घोटाळा

By admin | Updated: October 4, 2014 23:51 IST

नकली दागिने ठेवून २.८२ कोटींची फसवणूक

देवरुख : नकली दागिन्यांवर कर्ज घेऊन तब्बल ३९ जणांच्या टोळक्याने कोकण मर्कंटाईलमध्ये घोटाळा केल्याची धक्कादायक खबर उघड झाली असून, त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तब्बल दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांना गंडा घालण्यात आला असून, याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकण मर्कंटाईल बँकेच्या मुख्य शाखेने सोन्याचे दागिने तपासण्याचे यंत्र संगमेश्वरच्या शाखेत आणले होते. उदाहरणादाखल काही दागिने तपासण्यात आले असता ते दागिने नकली असल्याचे पुढे आले. त्यामुळे संपूर्ण बँकेतच खळबळ उडाली. ११ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत ठेवलेले दागिने हे बनावट असल्याचे पुढे आले आहे. ३९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सोनार प्रमोद सैतवडेकर व उदय सैतवडेकर (संगमेश्वर), सुचित्रा महाडिक, रहिसा नायकोडी, हफिजा नायकोडी, हिदायत दळवी, अरिफा सय्यद (सर्व कसबा - संगमेश्वर), विनोद कुळ्ये, आफताब शहा, आसमा शेख (कसबा), नौशाद खान (कोंड्ये), शौकत अलवारे, अली मेमन (पेठमाप), मेताज तांबे (मालदोली), अझरा बोदले (देवरुख), अतिसा काझी (कळंबस्ते), खरमान महाडिक, खतिबा बेबल (कसबा), मरींआबी फिलवान (कोंडीवरे), फरजाना तांबे (नायरी), रजिया गुलाम जियानी कुरेशी (माखजन), मोहनलाल रजापती, सुलेमान खान (कोंडीवरे), यासीम नाईक, बिल्कीश कालसेकर (कोंडीवरे), दिनार दिलीप पवार, सतीश गमरे (खेड), इक्बाल मुल्लाजी (कळंबस्ते), झहीर कोलथरकर (कोंड्ये), नसीमा नाईक (कसबा), राजेश महाडिक, जहिदा आंबेडकर, समुदा केदकर (आंबेड बुदु्रक), नुरजहा शहा दखनी, नसीना मुल्ला (संगमेश्वर), साजीया मुल्ला, फरिमा नाईक (कसबा), तौफिक सादीम (रत्नागिरी), नाजीरखान मापारी (मुचरी) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. संगनमताने बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.