शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सव्वाकोटींचे नुकसान

By admin | Updated: August 13, 2014 23:29 IST

आपत्तीमुळे पाचजणांचा मृत्यू : मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीची मदत

रत्नागिरी : जिल्ह्यात वादळी पावसाने गेल्या दोन महिन्यांत ३८७ घरांची पडझड झाली असून, त्यात एकूण ५८ लाखा २९ हजार ९१७ रूपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे एकूण ६४ लाख २ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. या पावसात मृत झालेल्यांची संख्या ५ असून, ६ जनावरांचा बळी गेला आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख ५४ हजार २०३ रूपयांच्या नुकसानाची नोंद आहे. यातील मृतांपैकी जणांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली. यावर्षी जूनमध्ये पाऊस गायब झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार वृष्टी करून जिल्ह्यातील अनेक घरे, गोठे, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात १० घरांचे आणि ११ गोठ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर ३४० घरांची आणि ३३ गोठ्यांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ३९४ असून, यापैकी फक्त २० घरे व गोठे यांना मदत दिलेली आहे. उर्वरित घरे आणि गोठे यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या सर्वांचे एकूण नुकसान ५८ लाख ४५ हजार ४३२ रूपये इतके झाले आहे.जिल्ह्यातील २४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ४ लाख ६६ हजार ७५, तर खासगी ४३ मालमत्तेचे ५९ लाख ३६ हजार २११ रूपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही मालमत्तांचे एकूण ६४ लाख ०२ हजार २८६ रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुरात, वीज पडून, दरड भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेपाच लाख रूपये जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ मदत देण्यात आली आहे. याच काळात आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तो नैसर्गिक आपत्तीने झाला नसल्याचे सांगत त्यांना मदत देण्यात आलेली नाही. तसेच या पावसात ६ जनावरांचा बळी गेला असून, एकूण १ लाख ३९ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या मालकांना नुकसानीची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, पंचनामे वेळेवर न झाल्याने पडझड झालेल्या घरांची नुकसानभरपाई मिळण्यात अडचण येत आहे. (प्रतिनिधी)