शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंच निवडणुकीत सेना-राष्टÑवादीची टक्कर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा ...

ठळक मुद्दे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व सिध्द करणाºया शिवसेनेला २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेस टक्कर देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने ५ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता, तर राष्टÑवादी काँग्रेसने २ विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण या तीन ठिकाणी सेनेचे आमदार निवडून आले. दापोली व गुहागर या दोन मतदारसंघात राष्टÑवादीने बाजी मारली. मात्र, त्यानंतर अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने मोठी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या ५५पैकी ३९ जागा सेनेने पटकावल्या व जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली. राष्टÑवादीला १६ जागांवर विजय मिळाला. मात्र, अन्य पक्षांचा या निवडणुकीत पुरता सफाया झाला.येत्या आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारने नगराध्यक्षांप्रमाणेच गावचा सरपंचही थेट जनतेतून निवडून आणण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पक्षीय चिन्ह देण्यात आली होती. थेट सरपंच निवडणुकीसाठीही पक्षाची चिन्ह वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निवडून आले यापेक्षा थेट सरपंच निवडून आणण्यास अधिक महत्व येणार आहे. सरपंच निवडून आल्यास ग्रामपंचायतीची सत्ता संबंधित पक्षाच्या हाती येणार आहे. त्यामुळेच जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून येऊ शकेल, अशा लोकप्रिय उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात जागा मिळाल्या नाहीत तरीही आता भाजपकडील इनकमिंग सध्या जोरात वाढले आहे. पक्ष राज्यात सत्तेवर असल्याने जिल्ह्यात थेट सरपंच अधिक प्रमाणात निवडून आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता आहे. कॉँगे्रस अद्यापही कूल कुलच आहे.निवडणूक : राजकीय शक्ती पणाला लागणारनिवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरुप येणार.राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू.जिल्ह्याच्या राजकारणावर सेना, राष्टÑवादीचे वर्चस्व.थेट सरपंचपदासाठी पक्षांकडून लोकप्रिय उमेदवारांचा शोध.आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जात आहेत. २०१९मध्ये विधानसभा निवडणुका जिल्ह्यात जिंकायच्या असतील तर येणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या रुपाने गावावर राजकीय वर्चस्व ठेवण्याची आवश्यकता आहे.