शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरची मतदार संख्या दीड लाखांवर

By admin | Updated: May 16, 2016 00:36 IST

निरंतर नोंदणी : दीड महिन्यात ५१९ नवीन मतदार

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमांतर्गत निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. यामध्ये दीड महिन्यात तब्बल ५१९ नवीन मतदारांनी नोंदणी करून घेतली आहे. यामुळे तालुक्याची मतदार संख्या सद्यस्थितीला १ लाख ५५ हजार २१६ वर जावून पोहचली आहे. निवडणूक आयोग यापूर्वी निवडणूकांपूर्वी मतदार यादीची तपासणी करत असे. मात्र, आयोगाने यात बदल करून एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी मतदार यादी दुरूस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करण्यास प्रारंभ झाला आहे. यातील सुरुवातीच्या दीड महिन्यामध्ये नवीन मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. याअंतर्गत एकूण ५१९ नवीन मतदारांनी आपली नोंदणी करून घेतली असून, चिपळूण मतदारसंघात ४११, रत्नागिरी मतदारसंघात ५५, राजापूर मतदारसंघात ५३ मतदारांनी नोंदणी केली आहे. संगमेश्वर तालुका हा तीन मतदार संघांमध्ये विभागला गेल्याने नोंदणीदेखील या मतदारसंघानुसार केली जाते. तालुक्याची यापूर्वीची मतदार संख्या १ लाख ५४ हजार ६९७ होती. ही संख्या चिपळूण मतदारसंघात १ लाख १२ हजार १२३, रत्नागिरी मतदारसंघात २१ हजार ३२७ व राजापूर मतदारसंघात २१ हजार २४७ अशी होती. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार प्रत्येक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नवीन मतदारांची नावे नोंदविणे, छायाचित्रात बदल, पत्त्यात बदल, नावात बदल अशी दुरूस्ती करणे व मयत मतदारांची नावे वगळणे, असा कार्यक्रम सुरू आहे. एप्रिल ते जुलै असा हा कार्यक्रम असून, नागरिकांनी आपल्या मतदार यादीत यापैकी काही बदल करावयाचे असल्यास मतदान केंद्र अधिकारी व तालुका निवडणूक कार्यालयाकडून हे बदल व नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)