शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर तालुका : तेवीस दवाखान्यांचा कारभार आठ अधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: July 16, 2014 22:41 IST

पशुधन विभागात तब्बल १५ पदे रिक्त

मार्लेश्वर : संगमेश्वर पंचायत समितीच्या पशुधन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल १५ पदे रिक्त आहेत. शासनाने ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका शेतीवरच चालते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन करुन आपली आर्थिक गरज भागवतात. शासनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत आहे.तालुक्यामध्ये एकूण २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, यापैकी केवळ ८ दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १५ दवाखान्यांमध्ये अधिकारी नेमण्यात आले नाहीत. त्यामुळे २३ दवाखान्यांचा कारभार ८ अधिकाऱ्यांना हाकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच पशुसंबंधी काही तक्रारी असल्यास शेतकरी आपल्या पशुला थेट दवाखान्यात न आणता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाच आपल्या दारी पाचारण करतात. परिणामी एकाचवेळी दोन तक्रारी आल्यास या अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागते. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते, तर शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.तालुक्यातील २३ दवाखान्यांचा कारभार अधिकाऱ्यांना सांभाळावा लागतो. त्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने १५ पदे त्वरित भरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. (वार्ताहर)