रत्नागिरी : सतत गैरहजर राहिल्याने त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वेतन बंद केले आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी दिली.ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा कणा असलेल्या जिल्ह्यातील १६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी त्यामध्ये १३४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा देण्यात येतो. तेथील रुग्णांवर औषधोपचार देण्यात यावे, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे अजूनही अस्थायी स्वरुपाची आहेत. त्यांना कायम करण्यात यावे, यासाठी मागील आठवडाभर कामबंद आंदोलन केले होते. अशा प्रकारे अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आंदोलने करण्यात आली आहेत.या बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीसा बजावूनही ते सेवेवर हजर झाले नाहीत. त्यामध्ये पणदेरी (मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. डी. व्ही. क्षीरसागर, दाभोळ (दापोली) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ए. आर. भोसले, फुरूस (खेड) प्राथमिक आरोग्यकेंद्राचे डॉ. ए. ए. शिंदे, डॉ. एस. एस. पाटील, फुरूस (चिपळूण) प्राथमिक आरोग्यकेंद्राचे डॉ. एस. आर. शेट्ये, कोंडउमरे (संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. वाय. ए. तरळ, जवळेथर (राजापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. पी. राठोड, सोलगाव (राजापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. एन. पाटील, केळवली (राजापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एस. एस. बेंबडे यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर)चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामेजिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील १२ वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर असतानाच आणखी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे चार वैद्यकीय अधिकारी कमी झाले असल्याने त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर झाला आहे.
बारा अधिकाऱ्यांचे वेतन केले बंद
By admin | Updated: July 11, 2014 00:05 IST