शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सह्याद्री धावला

By admin | Updated: May 24, 2016 23:38 IST

खेड तालुक्याच्या तळे गावातील ग्रामस्थांनी गावात चारा छावणी उभारून मराठवाडा विभागातील दुष्काळी भागात असणाऱ्या जनावरांसाठी १२० टन हिरवा चारा देण्याचा संकल्प केला.

आवाशी-(सुनील आंब्रे)  : दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना काहीतरी मदत करावी, या कल्पनेतून खेड तालुक्याच्या तळे गावातील ग्रामस्थांनी गावात चारा छावणी उभारून मराठवाडा विभागातील दुष्काळी भागात असणाऱ्या जनावरांसाठी १२० टन हिरवा चारा देण्याचा संकल्प केला. एवढेच नव्हे; तर त्याची पहिली गाडी २० टन चारा घेऊन लातूर येथील जळकोट येथे निघाली आहे.कोकणी माणूस दयाळू, हळवा, परोपकारी असल्याचे म्हटले जाते. हा माणूस दुसऱ्याचे दु:ख ते आपले समजून मदतीला धावताना कुचराई करत नाही. आजही त्याचा प्रत्यय येत आहे. खेड तालुक्यातील तळे हे गाव माणुसकीने व मनाने श्रीमंत आहे. येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून दुष्काळग्रस्तांना आपण काही मदत करू शकतो का? यावर विचारविनिमय केला आणि गावातच हिरवा चारा निर्माण करून तो जनावरांना देऊया, ही संकल्पना उभी ठाकली. मग सरपंच दीपाली मोरे, ग्रामस्थ कुंदन मोरे, चंद्रकांत मोरे, काशिनाथ मोरे, बाळकृष्ण मोरे, भागोजी मोरे, हरिचंद्र मोरे व अन्य ग्रामस्थांनी याचा निश्चय करत १ मे रोजी याची मुहूर्तमेढ रोवली. याला पाठबळ मिळाले ते दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांचे!याबाबत माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, मक्याचा चारा असे या प्रकल्पाचे नाव असून, दीड गुंठे जागेत हा प्रकल्प उभारला आहे. १ किलो मक्यापासून ७-८ किलो चारा केवळ सहा दिवसात तयार करता येतो. मका २४ तास भिजवून त्याला ४८ तासात मोड येतात. १ ट्रेयमध्ये १ किलो असे १० हजार ट्रेय बांबूची शेड उभी करून त्यावर ठेवण्यात आले आहेत.दर २ तासांनी त्याला केवळ २ मिनिटे पाणी सोडण्यात येते. दिवसाला १ हजार किलो असे आठवड्याला ७ हजार किलो चारा तयार होतो. इतर कोणतीही प्रक्रिया वा खर्च यास लागत नाही. आम्ही दुष्काळग्रस्त मराठवाडा भागाला १२० टन चारा देणार असून यानंतर आम्ही आमच्या गावातीलच जनावरांसाठी याचा वापर करणार आहोत. याआधी शासनाने रेल्वेतून लातूरला पाणी पुरवले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याने याच दुष्काळी भागातील जनावरांना आज हिरवा चारा पाठवून जिल्ह्यासह कोकणची मानही उंचावल्याचा प्रतिक्रिया जिल्हाभरातून उमटत आहेत.