शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. बस - दुचाकी अपघातात एक जण ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या पायथ्याशी गुहागर - मुंबई एस. टी. बस व दुचाकी यांची समोरासमोर ...

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या पायथ्याशी गुहागर - मुंबई एस. टी. बस व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकी चालक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात २३ मार्च रोजी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. विजय प्रकाश जाधव असे या मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.

गुहागर आगाराचे चालक दत्ताराम बाळकृष्ण महाडिक (४५) एसटी बस (एमएच २० बी एल १५७४) घेऊन दिनांक २३ रोजी गुहागरहून मुंबईला जात होते. रात्री साडेआठ वाजता कशेडी घाटाच्या पायथ्याशी हॉटेल अनुसयासमोर मुंबईहून खेडला येणाऱ्या दुचाकीसोबत (एमएच ०८ एयु १७७९) त्यांची धडक झाली. यात दुचाकी चालक विजय जाधव (२१, उतेकरवाडी - चोरवणे) हा जागीच गतप्राण झाला तर रोहित रंगराव जाधव (२०, भरणे, खेड) व तुषार दीपक जाधव (२१, उतेकरवाडी, चोरवणे) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच खेडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम कशेडी पोलीस टॅबचे एस. बी. बोरकर, समीर सुर्वे, पी. एस. दाभोलकर, मृत्युंजय दूत पथकाचे मुकुंद मोरे, महेश रानडे, सहदेव कदम यांनी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

..........................

खेड फोटो 241 मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या पायथ्याशी एसटी बस व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली.