शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कोटा परवाना पध्दत त्रासाची

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

एका शिबिरात शंभरच परवाने : ग्रामीण भागातील नवशिक्या लोकांची परवड कायम

शिरगाव : चिपळूण येथे महिन्यातून चारवेळा होणाऱ्या आरटीओ कॅम्पमध्ये नवशिक्यांना परवाना देण्याची कोटा पद्धत असंख्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक सोमवारी होणाऱ्या कॅम्पमध्ये केवळ १०० परवाने देण्याच्या शासन निर्णयामुळे झालेल्या त्रासाबद्दल आज अनेकांनी संताप व्यक्त केला. अलीकडे एकाच कुटुंबात चार वाहने वापरण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकींच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.साहजिकच शासन नियमाप्रमाणे प्रथम सहा महिन्यांसाठी शिकाऊ परवाना घेण्यासाठीची गर्दी वाढल्यानंतर अधिकारीवर्ग वाढवण्यापेक्षा ठराविक परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. दापोलीत महिन्यातून एकदाच कॅम्प होत असल्याने सर्व उर्वरित गावातील वाहने व परवाने याबाबतचे सर्व व्यवहार चिपळुणातच होत असतात.प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांच्या कारवाईला घाबरुन नवीन वाहनधारकांनी शिकाऊ परवाना काढण्यासाठी १०० मध्ये राहण्यासाठी सकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर हजर राहून अधिकाऱ्यांची त्यांनी तीन तास वाट पाहिली. इतक्या सकाळी नंबर लावणे केवळ चिपळूण शहर परिसरातील व्यक्तिनाच शक्य असते. ग्रामीण भागातून दहा वाजता चिपळूण येथे पोहोचलेल्या वाहनधारकांना वारंवार परत जावे लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. मुळातच चिपळूणला आरटीओ कॅम्प घेण्याचा मूळ उद्देश कोणत्याच अर्थाने सफल होत नाही, असे मत त्रस्त वाहनधारकांनी मांडले.चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील अनेकांनी कोटा पद्धतीबाबत नाराजी दर्शवली असून, हजर राहिलेल्या सर्वांना शिकाऊ परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चिपळूणप्रमाणेच दापोली येथे आरटीओने महिन्यातून केवळ एक कॅम्प न घेता त्याची संख्या वाढविल्यास त्याचा फायदा नविन परवानाधारकांना होईल व त्यातून कारभाराबाबत ्अधिक पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)