शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

हर्णै किल्ल्यावर रोप-वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:32 IST

अशी महत्त्वपूर्ण घोषणा भांडूपचे आमदार व दापोली - उटंबरचे सुपुत्र अशोक पाटील यांनी तालुक्यातील उटंबर येथे केली.

दापोली : दापोली तालुक्यातील पर्यटन वाढावे, याकरिता हर्णै येथील जलदुर्गात जाण्याकरिता येत्या वर्षभरात रोप-वे बांधण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भांडूपचे आमदार व दापोली - उटंबरचे सुपुत्र अशोक पाटील यांनी तालुक्यातील उटंबर येथे केली. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पहिला रोप-वे होण्याचा मान लवकरच दापोली तालुक्याला मिळणार आहे. उटंबर येथील शिवाजी महाराजांचे महान गुरू याकुबबाबा यांच्या उर्सनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यटकाची एक गाडी तालुक्यात आली की, ती किमान ५ हजार रुपये तालुक्याला देऊन जाते. मात्र, पर्यटकांची होणारी गैरसोय, तालुक्यातील खराब रस्ते यामुळे पर्यटक येथे पुन्हा येण्यास नाखूश असतात. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनेक योजना आपण आखल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून हर्णैमधील पाण्याच्या किल्ल्यात जाण्याकरिता आपण जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या रोप-वेची मागणी केली आहे. शिवाय आपण नुसती मागणी करून थांबलो नाही तर या रोप-वेचा प्रस्ताव अर्थसंकल्प समितीकडे सादर केला आहे. येत्या अधिवेशनात या कामाला मंजुरी मिळेल व वर्षभरात हर्णै येथे रोप-वे अस्तित्त्वात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य मुजीब रूमाणे यांनी दापोली अर्बन बँक याकुबबाबा दर्गा भाविकांकरिता थंड पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. तसेच एका महिनाभरात याकुबबाबा यांची इत्यंभूत माहिती असणारी वेबसाईट अस्तित्त्वात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज नदाफ यांनी याकुबबाबांच्या उर्सवर जेवढा खर्च होतो, या खर्चाच्या २५ टक्के रक्कम त्यांचा इतिहास लिहिण्यावर खर्च व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच याकुबबाबा हे मुस्लिम असल्याने त्यांना शिवाजी महाराजांच्या गुरूंमध्ये शेवटचा नंबर दिला जातो, असे सांगून याकुबबाबा व शिवाजी महाराज यांचे गुरू - शिष्याचे नाते जगभर पोहोचवणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे रऊफ हजवाने व दामोदर कुलाबकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मकबूल दिनवारे, वसीम परकार, निसार महालदार, कलंदर शेखनाग, सुरेंद्र कर्देकर, जावेद मणियार, वृषाली कुलाबकर, सादीक शेख, रहेमान बोरकर, जावीर पावसकर, जहूर झोंबडकर, मज्जीद चोगले, अलिमियाँ गंगरेकर, शशिकांत राऊत, वामन सावंत-पाटील, आकांक्षा कुलाबकर, अनंत कोळी, धर्मा कोळी, फय्याज मुजावर, ताबीज सोलकर, झहूर कुलाबकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)