अडरे : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती रिया राहुल कांबळे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिकोटी बेळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रिया कांबळे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचबरोबर गावात महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे गोवा, कर्नाटक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावेळी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी खासदार सुधीर सावंत, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर उपस्थित होते.