शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

२३० एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार

By admin | Updated: April 30, 2016 00:47 IST

टेटवलीतील शेतकऱ्यांना दिलासा : दापोली कृ षी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने सात-बारा असलेल्या परंतु शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त शेतजमिनी शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत झाला. टेटवली गावातील २३0 एकर जमीन मूळ मालकांना परत केली जाणार असून, तसा प्रस्ताव कार्यकारी परिषद सरकारला देणार आहे.दापोलीचे आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने १९७२ च्या दरम्यान विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासाठी हजारो एकर जमिनी अल्पदराने घेतल्या होत्या; परंतु वाकवली-टेटवली या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची २ हजार एकर जमीन विद्यापीठाकडे पडून आहे. या जमिनीचा कसल्याही प्रकारे वापर केला जात नाही. विद्यापीठाकडे अतिरिक्त असणाऱ्या जमिनीची मालकी कृ षी विद्यापीठाकडे आहे; परंतु त्या जमिनी अजूनही शेतकरी कसत आहेत. त्याचा सात-बारा कृ षी विद्यापीठाचा व जमिनी शेतकऱ्यांकडे अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी असूनसुद्धा शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत, असा मुद्दा पुढे आला. त्यादृष्टीने शुक्रवारी झालेल्या कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत टेटवली गावातील २३० एकर जमिनींचे हस्तांतरण शेतकऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या जमिनीचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा व जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.कृ षी विद्यापीठातील १०९ रोजंदार मंजुरांची पदे भरण्यात आली; परंतु शिपाई, मजूरदार यांना गावापासून लांब ठेवण्यात आले आहे. अशा लोकांना त्या त्या भागातील जागेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पर्यटनासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. नाममात्र शुल्कामध्ये विद्यापीठात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.या कार्यकारी परिषदेला विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसह दापोलीचे आमदार संजय कदम, ठाणेचे आमदार संजय केळकर, राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. (प्रतिनिधी)ज्या शेतकऱ्यांच्याजमिनी विद्यापीठाकरिता गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा. इतर विद्यापीठांत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळतो, मग दापोली कृ षी विद्यापीठातील शेतकऱ्यांना हा दाखला का दिला जात नाही?- संजय कदम, आमदार