शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 11, 2014 21:59 IST

मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप

 संगमेश्वर : मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी टाकलेला प्रकाशझोत व जनमताच्या रेट्यामुळे मालेगाव महानगरपालिकेने पाणवेली काढण्यास सुरुवात केली; मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींची पाठ फिरताच काम बंद झाल्याचे विदारक चित्र काल येथे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.महानगरपालिकेचे जेसीबी यंत्र खराब असल्याचे कारण देऊन स्वच्छता मोहिमेस आधीच उशीर झाला होता. काल दुसऱ्या जेसीबी यंत्राद्वारे पाणवेली काढण्यास सकाळी सुरुवात झाली. मात्र काही वेळातच जेसीबी चालकाला कामच करता येत नसल्याचे कारण देत हे काम बंद पाडले. कारण देऊन जेसीबी यंत्र माघारी फिरले. नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच शनिवारपासून शहरात पुन्हा विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. सकाळी तीन तास तर सायंकाळी ५ ते ८ या तीन तासात वीज गायब होत आहे. याचवेळी डास मच्छरांचे आगमन होते आणि नागरिकांना या डास-मच्छरांना तोंड देता देता अक्षरश: नाकीनऊ येते. संगमेश्वर नदीकिनारी प्रत्येक घर, दुकानांसमोर धूर करून नागरिक वीज येण्याची वाट बघत होते.आगामी सण-वार लक्षात घेता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी अपेक्षित असते. मात्र विजेचे भारनियमन व डासांचा हमला यामुळे महिला, मुले कशीबशी खरेदी पटकन आटोपून या भागातून पळ काढताना दिसत होते. (वार्ताहर)पिंपळगावी दुबार पेरणीचे संकटपिंपळगाव वाखारी : खरीप हंगामातील बाजरीच्या पिकाची दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाऊस उशिरा आल्याने परिसरात शेतकऱ्यांनी अत्यल्प ओलीवर खरिपाची पेरणी केली. खरीप पिकांतील बाजरीची उगवणी असमाधानकारक असून, उगवलेली बाजरीचे कोंब मरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़