शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण व पदोन्नती आमचा संविधानिक हक्क : सुधाकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

रत्नागिरी : शासनाने अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांचे नोकरीतील पदाेन्नती आरक्षण बंद करुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने ...

रत्नागिरी : शासनाने अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांचे नोकरीतील पदाेन्नती आरक्षण बंद करुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्याच्या ठिकाणी सुधाकर कांबळे यांचे नेतत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निदर्शन व आंदोलनामध्ये आरक्षण व पदोन्नती आमचा संविधानिक हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, असे अध्यक्षीय मार्गदर्शनात सुधाकर कांबळे यांनी शासनाला फर्मावलं आहे.

ते पुढे म्हणाले, शासनाने अध्यादेश काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करुन घटनात्मक अधिकार डावलले आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना स्मरुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. मागसवर्गीय समाजाला राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण बहाल केले. तो दिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा शाखेने पदोन्नतीमधील आरक्षण देण्याबाबत निदर्शन आंदोलन करून आपली रास्त मागणी केली आहे.

ही आंदोलने रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मंडणगड - शांताराम पवार, प्रमाेद जाधव, दापोली - उमेश मर्चंडे, चंद्रमणी महाडिक, बिपीन मोहिते, खेड - अशोक मानकर, विलास शिंदे, चिपळूण - मनोज पवार, देवीदास शिंदे, सुनील सुर्वे, गुहागर - सुहास गायकवाड, सुधाकर कांबळे, संगमेश्वर - प्रमोद पवार, दिलीप तांबे, रत्नागिरी - संजय तांबे, पोतदार सर, लांजा - शिवाजी कांबळे, संतोष पडवणकर, एस. पी. भालशंकर, प्रभाकर शिंगये, राजापूर - प्रमोद जाधव, भारत कांबळे यांनी यशस्वी केली.

या निदर्शन आंदोलनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी. आर. चव्हाण, महासंघाचे सरचिटणीस मोहन कांबळे, खजिनदार संतोष गमरे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गोपाळ कांबळे, माध्यमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, जिल्हा संघटक राजेश गमरे, डॉ. हरिष धमगये, वासुदेव वाघे, नगर परिषदचे किरण मोहिते, आराेग्य विभागाचे विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे सुरेश कांबळे सहभागी झाले होते.