रत्नागिरी : जिल्हा शासकीय रूग्णालयातील विविध समस्यांबाबत भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीतर्फे सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. भाजपचे प्रवक्ते बाळ माने व पदाधिकार्यांनी यांनी रूग्णालयातील विविध समस्या मांडल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध सेवा, उपक्रमांच्या उद्घाटनासाठी येथे आले होते. त्यावेळी पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा बार्इंग, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, शहराध्यक्ष संजय पुनसकर, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय हे आरोग्य मंदिर आहे. याठिकाणी पायाभूत सेवा-सुविधा आहेत; परंतु त्या चालवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचार्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांचे समाधान करणे अशक्य आहे. डॉक्टर येथे येत नाहीत, राहत नाहीत. त्यामुळे अनेकदा उपलब्ध डॉक्टरांच्या कामकाजावर ताण पडून वादविवाद, भांडणे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण त्यावर आवश्यक कार्यवाही, उपाययोजना आतापर्यंत झालेल्या नाहीत. वैद्यकीय अधिकारी परजिल्ह्यांतून येतात, पण त्यांना निवासस्थानासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे हा प्रश्न सोडवावा. रुग्णालयात कोणत्याही प्रकारची औषधे बाहेरून लिहून दिली जाणार नाहीत, असा दावा करण्यात येतो. पण जिल्हा रुग्णालयात विंंचू दंशावरील प्रॅजोप्रेस ही गोळी उपलब्ध होत नाही. तसेच हृदयविकाराचा झटका आल्यास लागणार्या इकोस्प्रिन, क्लोपीटॅब, अॅटोरवास्टिन, एवढेच नव्हे तर साधी सॉर्बिट्रेटसुद्धा मिळत नाही, असे बाळ माने यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. वर्ग ३ व ४ मधील अनेक मंडळी सेवानिवृत्त किंंवा बदली झाल्याने अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात मंंजूर ४०८ पैकी १०२ पदे रिक्त आहेत. तर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मंजूर ४१६ पदांपैकी १०६ पदे रिक्त आहेत.मेडिकल कॉलेजची ङ्कमागणी, धर्मशाळा, कँटीनची दुरवस्था झाल्याचे बाळ माने यांनी यावेळी शेट्टी यांना सांगितले.
रूग्णालयातील समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: May 26, 2014 01:01 IST