शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

CoronaVirus Positive News सकारात्मक माहिती : रत्नागिरी जिल्ह्यातील १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:46 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे.

ठळक मुद्देशिथिल केलेले नियम हटवून कडक नियमावली लागू होऊ शकते. ते टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीव जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी १३३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालांमध्ये मंगळवारी रात्री आलेले ४८ तर बुधवारी सकाळी आलेल्या ८५ अहवालांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, १५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या वाढत असून, जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात येत आहेत.

मिरज येथे पाठविलेल्या काही अहवालांपैकी मंगळवारी रात्री ४७ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये मंडणगडमधील २७, कामथेमधील ११ व गुहागरमधील ९ अहवालांचा समावेश आहे. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बुधवारी सकाळी आणखीन ८५ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील ७५, कामथे उपजिल्हा रूग्णालयातील १० अहवालांचा समावेश आहे. हे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे. जिल्हा रेडझोनमध्ये गेल्यास शिथिल केलेले नियम हटवून कडक नियमावली लागू होऊ शकते. ते टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या