शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राजापूरला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. ...

राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

मंगळवारी, १८ मे रोजी ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९०२ इतका झाला आहे. राजापूर तालुक्यात मृतांचा आकडा वाढला असून, आजपर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजापूर तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल परांजपे यांनी दिली आहे.

गत सप्ताहात राजापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र, हा आठवडा काहीसा दिलासादायक ठरत आहे. सोमवारी १६, तर मंगळवारी १६, असे ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवार अखेर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,७५८ इतका झाला आहे. यापैकी ९०२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, ७८७ जण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ६९ जण मृत्युमुखी पडले आहेत. अ‍ॅक्टिव्ह ९०२ रुग्णांमध्ये ७५४ जण होम आयसोलेशनमध्ये, रायपाटण कोविड केअर सेंंटरमध्ये ६३ जण, जिल्हा शासकीय रुग्णालयात ५३ जण, खासगी रुग्णालयामध्ये १४ जण, तर तालुक्याबाहेर १८ जण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ग्रामीण भागात प्रिंदावणमध्ये २२ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आले होते. या ठिकाणी आरोग्य विभागाचे एक विशेष पथक काम करीत असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.