शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Ratnagiri updates-ऐच्छिक कोरोना तपासणीच्या शुल्कात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 15:45 IST

CoronaVirus Ratnagiri updates-कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. हे तपासणी शुल्क पूर्वी १००० रुपये इतके होते. मात्र, ते आता निम्मे करण्यात आल्याने कोेरोना चाचणी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देऐच्छिक कोरोना तपासणीच्या शुल्कात कपातकोेरोना चाचणी करणाऱ्यांना काहीसा दिलासा

रत्नागिरी : कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. हे तपासणी शुल्क पूर्वी १००० रुपये इतके होते. मात्र, ते आता निम्मे करण्यात आल्याने कोेरोना चाचणी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये ऐच्छिक तपासणीशिवाय इतरांचीे मोफत कोरोना तपासणी करण्यात येते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, इतर राज्यात अथवा परदेशात कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच अनेक कंपन्यांकडून अचानकपणे कर्मचाऱ्याला बोलावून घेतले जाते. अशावेळी कोरोना तपासणी करूनच प्रवेश दिला जातो. त्यासाठी कोरोना तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते.खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणी करण्यासाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आल्यास खासगी रुग्णालयांमध्ये खर्च वारेमाप घेत असल्याची ओरड नेहमीच होत असते. मात्र, जिवापेक्षा पैसा महत्त्वाचा नसल्याने काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपयांचे बिल भरण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावर मोफत औषधोपचार केले जात आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरुवातीला शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीसाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, हे शुल्क कमी करण्यात येऊन आता ५०० रुपयांवर आणण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना तपासणीची रक्कम आकारून नियमानुसार पावती देण्यात येते. तसेच तपासणीची रक्कम डिस्ट्रीक्ट टास्क फोर्स कमिटी कोविड फंडाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्याचा अहवाल वेळोवेळी प्रशासनाला सादर करण्यात येतो.

परदेशात जाणारे आणि ऐच्छिक तपासणी करणाऱ्यांकडूनच कोविड तपासणीची रक्कम घेण्यात येते. संशयित किंवा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांकडून कोणतेही कोविड तपासणीचे शुल्क आकारण्यात येत नाही. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी