शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘खंबाटा’चे कोकणातील कर्मचारी करणार राऊत यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:39 IST

रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार ...

रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी २७६३ कामगारांना देशोधडीला लावले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही विनायक राऊत यांच्या संस्थेला खंबाटा एव्हिएशनकडून थेटपणे एक मोठ्या रकमेचा धनादेश मिळाला होता, असा आरोप केला होता. या कंपनीचे ६० टक्के कामगार हे कोकणातील असून ते गावोगावी जाऊन खासदार राऊत यांचा खरा चेहरा मतदारांसमोर ठेवणार आहेत. राऊत यांना त्यांच्या प्रश्नांची उतरे द्यावीच लागतील, असे स्वाभिमानचे रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार नीलेश राणे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी नीलेश राणे याच्यासोबत उपस्थित खंबाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीचे कर्मचारी सुनील तळेकर म्हणाले की, कंपनी अडीच वर्षांपूर्वी बंद पडूनही कामगारांचे सहा महिन्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधी, लिव्ह एन्कॅशमेंट व अन्य फायदे अजूनही मिळालेले नाहीत. त्यातील अनेक कामगारांनी गेल्या अडीच वर्षात आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. या सर्व स्थितीला विनायक राऊत हे जबाबदार आहेत. असे असतानाही त्यांनाच रत्नागिरी मतदारसंघातून सेना पक्षप्रमुखांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. राऊत यांच्या भ्रष्टाचाराचे ठाकरे यांनी समर्थनच केले आहे, असा आरोप सुनील तळेकर यांनी केला आहे. राऊत यांनी कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत त्याच जागेत बडस एव्हिएशन कंपनी येण्यास मदत केली, असे तळेकर म्हणाले.कर्मचारी विश्वनाथ दळवी म्हणाले, खंबाटा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर अवलंबून ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे. कंपनी २०१६ला बंद झाली, त्यामागील खरा सूत्रधार विनायक राऊत हेच आहेत. खंबाटाचे पूर्ण युनिट राऊत हे पाहात होते. कर्मचाºयांच्या येणे असलेल्या रकमेबाबत राऊत यांनी आजपर्यंत आम्हाला उत्तर दिलेले नाही, असे दळवी म्हणाले.राऊत यांना यावेळी मत मागण्याचा अधिकारच नाही. त्यांना घरी उभेही करू नका, असे आम्ही सर्व कर्मचारी मतदारांना आवाहन करणार आहोत. ज्या ज्यावेळी आम्ही राऊत, पक्षप्रमुख ठाकरे यांना भेटलो त्या त्यावेळी पाहतो, करतो, असे सांगून आजपर्यंत काहीच केलेले नाही. भेट नाकारणे, उडवाउडवी सुरूच आहे. कामगारांबाबत राऊत व सेनेला सोयरसूतक नाही. त्यामुळे या प्रकरणी राऊत यांच्याबरोबर पक्षप्रमुख ठाकरे हेसुध्दा गुन्हेगार आहेत, असा आरोप दळवी यांनी केला.