शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीची मैत्रेयी गोगटे महिला एकेरीत अजिंक्य

By admin | Updated: February 29, 2016 00:18 IST

राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा : पुरूष गटात संदीप देवरूखकर विजयी; राज्यातील ५०० खेळाडूंचा समावेश

रत्नागिरी : शिवाजी पार्क जीमखान्याने आयोजित केलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकाच्या कॅरम स्पर्धेच्या पुरूष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे ओएनजीसीमध्ये कार्यरत असलेला तिसरा मानांकित राष्ट्रीय विजेता संदीप देवरूखकर, रत्नागिरीच्या अग्रमानांकित मैत्रेयी गोगटे यांनी विजेतेपद पटकावले.स्पर्धेत ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत संदीप देवरूखकरने रंगतदार दोन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत जैन इरिगेशनचा माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा २५-११, २५-१४ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा मान मिळवला. योगेश डोंगडेला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.पहिल्या सेटमध्ये संदीप देवरूखकरने १९-११ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ६ गुण मिळवून २५-११ असा सामना जिंकला. दुसऱ्या गेमध्ये पाचव्या बोर्डपर्यंत ७-७ अशी बरोबरी असताना सहाव्या बोर्डमध्ये ११ गुण घेऊन संदीप देवरूखकरने १८-७ ची आघाडी घेतली. नंतरच्या सातव्या बोर्डमध्ये योगेश डोंगडेचा ७ गुण घेऊन १४-१८ पिछाडीवर होता. निर्णायक आठव्या बोर्डमध्ये ७ गुण घेऊन दुसऱ्या गेममध्ये २५-१४ असा जिंकून संदीप देवरूखकरने विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मोहम्मद गुफरानने ठाण्याच्या राजेश गोहीलचा रोमहर्षक तीन गेममध्ये रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-0, १३-२५, २५-२० अशी मात करताना पहिल्या गेममध्ये ब्रेक टू फिनिशची नोंद केली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संदीप देवरूखकरने मोहम्मद गुफरानचा दोन गेममध्ये रंगलेल्या सामन्यात २५-१०, २५-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात योगेश डोंगडेने ठाण्याच्या राजेश गोहीलचा २५-८, २५-११ असा दोन गेममध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. महिला एकेरीमध्ये रत्नागिरीच्यामैत्रेयी गोगटेने तिसऱ्या मानांकित प्रीती खेडेकरचा रोमहर्षक दोन गेममध्ये २५-२०, २५-१९ असे नमवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले व रोख ७ हजार ५०० रुपये व चषक याची मानकरी ठरली. उपविजेत्या प्रीती खेडेकरला ५ हजार व चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच केतन चिखले-रत्नागिरी, सुहास कारभारी-रायगड यांनी केले. (प्रतिनिधी)