शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळूणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यासह तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:42 IST

गणेश विसर्जनासाठी ओढ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली.

रत्नागिरी, दि. 28 - गणेश विसर्जनासाठी ओढ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली. शंतनू शांताराम दुर्गवले (१४) आणि रोहीत तुकाराम दुर्गवले (२३) अशा दोघांचा मृतदेह हाती आला असून, संकेत शांताराम धावडे (२३) याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन उद्या मंगळवारी होत आहे. विसर्जनासाठी आबीटगाव ते तुरंबव हा ओढा तसेच गणेश विसर्जन घाट साफ करण्यासाठी आबीटगाव येथील अकरा तरूण सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी वाढले होते. अकरा तरूणांपैकी तिघेजण साफसफाईसाठी ओढ्याच्या पाण्यात उतरले आणि उरलेले आठ तरूण गणपती ठेवण्यासाठीची जागा साफ करत होते.

साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा लोंढा वाढल्यामुळे ओढ्यात उतरून साफसफाई करणारे संकेत, शंतनू आणि रोहीत हे तिघेजण वाहून गेले. काठावर साफसफाई करणा-या तरूणांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मदतीसाठी इतरांना बोलावले. मदतसाठी आलेल्या लोकांनी या तिघांचाही कसून शोध घेण्यास सुरूवात केली. त्यात शंतनू आणि रोहीतचा मृतदेह हाती लागला आहेत. मात्र संकेत धावडे बेपत्ताच झाला आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेची माहिती कळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

गावावर शोककळा..अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ममुसळधार पावसातही बहुतांश ग्रामस्थ विसर्जन घाटावर दाखल झाले आहेत. पोलीस तसेच ग्रामस्थ तिसºया बेपत्ता तरूणाचा शोध घेत आहेत.