शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

रत्नागिरी पालिकेत तिरंगी लढत अटळ

By admin | Updated: January 3, 2016 00:59 IST

राजन शेट्येंची याचिका फेटाळली : केतन शेट्ये, राजन शेट्ये, उमेश कुळकर्णी निवडणूक रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार केतन शेट्ये यांचा अपुरी माहिती असलेला उमेदवारी अर्ज भरून घेतल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार राजन शेट्ये यांनी घेतला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका राजन शेट्ये यांनी न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत अटळ झाली आहे. रत्नागिरी पालिकेची ही पोटनिवडणूक येत्या १० जानेवारीला होत आहे. त्यासाठी सेनेतर्फे माजी नगरसेवक राजन शेट्ये, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे केतन शेट्ये व भाजपचे उमेश कुळकर्णी हे निवडणूक रिंगणात आहेत. केवळ एका जागेसाठी होत असलेली ही निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, नगरसेवक उमेश शेट्ये यांनी प्रतिष्ठेची बनविली आहे, तर केतन शेट्येंचे आव्हान पेलण्याची संपूर्ण तयारी आमदार उदय सामंत यांनी केली असून, सेना नेत्यांनीही ही पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या निवडणूक प्रचारासाठी तटकरे तसेच सेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आदी हजेरी लावणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत सेना-भाजप युती नाही. सेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केले असून, हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच रंगत आली आहे. पालिकेतील २८ पैकी २७ नगरसेवकांमधील १४ संख्याबळ शिवसेनेकडे आहे. दुसऱ्या बाजूला भाजप ८, राष्ट्रवादी ४ व कॉँग्रेस १ असे १३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला सभागृहातील संख्याबळ समसमान राखण्यासाठी या जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे आमदार सामंत व त्यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत हे राजन शेट्ये यांच्या विजयासाठी रत्नागिरीत ठाण मांडून आहेत. (प्रतिनिधी) प्रचाराची धूम... निवडणुकीला अवघा आठवडा उरला असताना सेना व राष्ट्रवादीचे उमेदवार मतदारांच्या घरी तिसऱ्यांदा पोहोचत असल्याचे चित्र आहे. भाजप उमेदवार उमेश कुळकर्णी यांच्यासाठी त्यांचा प्रचारही जोमात सुरू आहे. भाजपतर्फे गुप्तपणे प्रचारही केला जात आहे. तीनही पक्षांकडून ध्वनिक्षेपकावरून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. फोनद्वारे वारंवार मतदारांशी संपर्क साधला जात आहे. छोट्या छोट्या कोपरा सभांनाही जोर आला आहे. करविषयक भरणाही अपूर्ण राष्ट्रवादीचे उमेदवार केतन शेट्ये यांनी संपत्तीविषयक अपुरी माहिती उमेदवारी अर्जात दिली आहे. तसेच करविषयक भरणाही अपूर्ण असल्याचा दावा करीत हा अर्ज स्वीकारणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात राजन शेट्ये यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निकाल काय लागणार याबाबत शहरवासीयांत तर्कवितर्क लढविले जात होते; मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने राजन शेट्ये यांची याचिका फेटाळल्याने तिरंगी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.