शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-ओवशाच्या सुपाला सोन्याचा भाव

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

बुरूड व्यवसायाला तेजी

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. यावर्षी गौरी पूर्वा नक्षत्रावर येत असल्याने सर्वत्र गौरी पूजन व नवविवाहितांचे ओवसे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाचशे ते सहाशे रूपये दराने ओवशाची सूपे विकण्यात येत असल्यामुळे बुरूड व्यवसायाला तेजी आलेली दिसून येते.मोठे सूप व लहान चार शिपल्या मिळून पाच सुपांचा सेट नवविवाहितांच्या ओवशांसाठी विकत घेतला जातो. फळे, पाच प्रकारचे गोड पदार्थ, पान सुपारी, नारळ सुपात ठेवून गौरी पूजन केले जाते. नवविवाहिता माहेरहून ओवसा तयार करून सासरी घेऊन घेतात. माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी ओवसा देण्यात येतो. ओवसा दिल्यावर विवाहितेला भेटवस्तू साडी किंंवा पैसे तसेच ओटी देण्यात येते. गतवर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्या होत्या. यावर्षीदेखील पूर्वा नक्षत्रात आल्याने ओवसे केले जाणार आहेत.ओवशासाठी सुपांची विक्री सुरू आहे. रोखीचे पैसे मिळत असल्याने या व्यवसायात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे एरव्ही अवकळा असलेल्या बुरूड व्यवसायाला या महिनाभरात का होईना, परंतु तेजी आली आहे. ओवशासाठी सुपांना सोन्याचा भाव आला आहे. पारंपरिक बुरूड व्यवसाय करणारी मंडळी बांबू कापून त्यापासून पट्ट्या तयार करून सुपे तयार करतात. मोठे सूप वळण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ छोटी सूपे तयार करण्यास लागतो. मोठी सूपे सर्रास विकत मिळतात. मात्र, छोटी सूपे किंवा शिपल्या विणणारी मंडळी आता संख्येने कमी झाली आहेत. त्यामुळे या व्यवसायातील दलाल मंडळी घाऊक स्वरूपात गुजरात राज्यातून सूपे विकत आणतात. ५० ते ६० रूपयांमध्ये हे सूप विकत मिळते. हजारो सूपे एकाच वेळी खरेदी करून आणली जातात. शिपल्या तेथे मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात बुरूड व्यवसाय करणाऱ्या मंडळींकडून विकत घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळींनादेखील मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. दलाल मंडळी ग्रामीण भागातून अल्प किमतीत शिपल्या खरेदी करून पाच सुपांचा सेट ५०० ते ६०० रूपयांना सहज विकताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)ओवशांसाठी सूपे लागत असल्याने रोखीने ती खरेदी केली जातात. शिवाय दरवर्षी ओवसे येत नसल्यामुळे यावर्षी अधिकाधिक ओवसे उरकण्यात येणार आहेत. त्यामुळे सुपांना विशेष मागणी दिसून येत आहे. गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो. नवविवाहितांचे ओवसे करण्याची प्रथा असल्यामुळे ओवशांच्या सुपांना अधिक मागणी होत आहे. मोठी सूपे गुजरातमध्ये स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. परंतु शिपल्या केवळ आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होतात. आंबेशेत, देवरूख, पोमेंडी, राजापूर, चिपळूण येथून आणली जातात. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे सणासुदीच्या काळात दोन पैसे मिळतात.ए. एस. पवार, रत्नागिरी