शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:29 IST

Ratnagiri Nagar Parishad, muncipalcarporation रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्देरत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुटपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारीअतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाली होती. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. सकळाी मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी, इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.या कारवाईतून ग्रामीण भागातून टोपलीतून भाजी घेऊन येणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, हातगाडी, टपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले आहे.नगर परिषदेने केवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हातगाडीवाले, फळविक्रेते यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला पक्के बांधकाम केलेल्यांना अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हातावर पोट घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून नगर परिषद काय साध्य करत आहे, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद