शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘लालपरी’ सुसाट, रत्नागिरी विभाग राज्यात तिसरा; किती मिळाले उत्पन्न.. वाचा सविस्तर

By मेहरून नाकाडे | Updated: November 28, 2024 18:50 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करीत राज्यात तृतीय क्रमांक मिळविण्यात रत्नागिरी विभागाला यश आले आहे. दि. १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रति दिन रत्नागिरी विभागाला एक कोटी १० लाख ७७ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने एक कोटी ११ लाख ३८ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००. ५५ टक्के उद्दिष्ट प्राप्त करून विभागात तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रथम क्रमांकावर परभणी विभाग, तर द्वितीय क्रमांकावर लातूर विभाग आहे. चाैथा क्रमांक अमरावती विभागाने मिळविला आहे.शासनाने महिलांना एसटीतून निम्म्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत दिली. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही निम्म्या तिकीट दरात प्रवासाची सवलत असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांचा एसटीला चांगला फायदा झाला असून, प्रवासी भारमानात भरघोस वाढ झाली आहे.दिवाळीच्या सुटीत तर दि. १५ नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रवाशांनी भरभरून एसटीच्या गाड्या पळत होत्या. रत्नागिरी विभागानेही सुटीच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी पाहून गर्दीच्या मार्गावरील फेऱ्या वाढविल्या होत्या. मुंबई, पुणे मार्गावरील जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एकूणच योग्य नियोजनामुळे एसटीला फायदा झाला आहे.

आगार - उद्दिष्ट - पूर्तता - टक्केवारी

  • परभणी - ८५.४९ - ८६.५१ - १०१.२०
  • लातूर - १११.७९ - ११२.४४ - १००.५७
  • रत्नागिरी - ११०.७७ - १११.३८ - १००.५५
  • अमरावती - ६६.१३ - ६६.१६ - १००.०५

प्रवाशांची गर्दी पाहून त्या-त्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. विभागातील सर्व चालक-वाहक, कर्मचारी, अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे उद्दिष्टपूर्ती करण्यात यश आले आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी