शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीचे सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

आरीफ शहा : कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वांत चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पन्नास एकर शेतीचे गट तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करून त्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय खते तयार करणे, कीटकनाशके, पिकांचे लागवडीपासून उत्पादनापर्यंत वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशकेवगळता रासायनिक खते, कीटकनाशके वापरता येणार नाहीत. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येकी ५ मिळून एकूण १५ गट तयार करण्यात आले आहेत. एका बचत गटासाठी तीन वर्षात एकूण १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गांडूळ खत तयार करणे, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन घेण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय बचतगट योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)