शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

रत्नागिरीत सेना-आघाडीची ‘मोहर’

By admin | Updated: December 26, 2014 23:44 IST

पालिका विषय समिती : नगराध्यक्ष मयेकर पडले एकाकी

रत्नागिरी : येथील नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदांवर आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सेना-शहर विकास आघाडीने आपली मोहर उमटवली. सर्व सहा सभापतीपदे काबिज करीत सेनेने पालिकेच्या कारभारात यापुढे आपला वरचष्मा राहील हेच सिध्द केले आहे. यामुळे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे एकाकी पडले असून, पालिकेत अध्यक्ष भाजपाचे व सभापती सेनेचे असे विरोधाभास निर्माण करणारे चित्र निर्माण झाले आहे. सेना व आघाडीकडेच सर्व विषय समित्यांची सभापतीपदे राहतील, यासाठी सेना व शहर विकास आघाडीची गुरुवारी रात्री गुप्त बैठक झाली होती. त्यावेळीच समिती सभापतीपदांचे वाटप निश्चित करण्यात आले होते. याबाबत आज ‘लोकमत’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले. दोन समिती सभापतीपदे शहर विकास आघाडीला देण्यात आली आहेत, तर आघाडीचे प्रमुख दत्तात्रय तथा बाळू साळवी यांची स्थायी समितीवर निवड झाली आहे. तसेच भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर व सेनेचे प्रदीप तथा बंड्या साळवी यांचीही स्थायी समितीवर निवड झाली. पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सहा समिती सभापती व नव्याने निवड झालेले ३ सदस्य यामुळे स्थायी समिती सदस्यांची संख्या १० झाली आहे. आज (शुक्रवार) झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी, सेनेचे पक्षप्रतोद प्रदीप साळवी, राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर, शहर विकास आघाडीचे प्रमुख दत्तात्रय तथा बाळू साळवी यांच्यासह सर्व २८ नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीचे अर्ज प्रभारी मुख्याधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी स्विकारले, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले. आजच्या विषय समिती निवडणुकीत शिवसेनेकडे चार, तर शहर विकास आघाडीकडे २ सभापतीपदे आली आहेत. निवड झालेले विषय समिती सभापती व सदस्य याप्रमाणे : सार्वजनिक बांधकाम समिती सभापती - योगेश पंडित, सदस्य - रामेश्वरी धुळप, सुनील डाफळे, विनय मलुष्टे, प्रज्ञा भिडे, सुप्रिया रसाळ, सईद पावसकर, दत्तात्रय साळवी.शिक्षण समिती : सभापती - शिल्पा सुर्वे (सेना) सदस्य - रामेश्वरी धुळप, विनय मलुष्टे, मधुकर घोसाळे, संपदा तळेकर, पल्लवी पाटील, सुदेश मयेकर, मुनीज जमादार. आरोग्य समिती : सभापती उपनगराध्यक्ष संजय साळवी (सेना), सदस्य - उज्ज्वला शेट्ये, मिलिंद कीर, नुरुद्दिन पटेल, सुनील डाफळे, सुप्रिया रसाळ, राजश्री शिवलकर, सईद मजगावकर, मुनीज जमादार. पाणीपुरवठा समिती : सभापती - स्मितल पावसकर (शहर विकास आघाडी), सदस्य - विनय मलुष्टे, मिलिंद कीर, मधुकर घोसाळे, सुनील डाफळे, दीपा आगाशे, संपदा तळेकर, सईद पावसकर.नियोजन समिती : सभापती - प्रीती सुर्वे (शहर विकास आघाडी), मधुकर घोसाळे, प्रदीप तथा बंड्या साळवी, नुरूद्दिन पटेल, मिलिंद कीर, प्रज्ञा भिडे, पल्लवी पाटील, प्रीती सुर्वे, मुनज्जा वस्ता.महिला व बालकल्याण समिती-सभापती रशिदा गोदड (सेना), उपसभापती मुनीज जमादार, सदस्य-रामेश्वरी धुळप, नुरुद्दिन पटेल, उज्ज्वला शेट्ये, दीपा आगाशे, राजश्री शिवलकर, मुनज्जा वस्ता. (प्रतिनिधी)