शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सावकारी परवान्यासाठी ५० हजाराची लाच घेणारा जाळ्यात

By शोभना कांबळे | Updated: July 11, 2024 15:46 IST

Ratnagiri News: सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले.

- शोभना कांबळे

रत्नागिरी - सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले. विनायक रामचंद्र भोवड (वय ५७ वर्षे,) असे त्याचे नाव आहे.

आरोपी विनायक भोवड, वर्ग ३ (राहणार - 'स्वामी' त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी (वर्ग-3)याने सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी आपल्याकरिता आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला देण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडून २६ जून २०२४ रोजी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुरूवार, दि. ११ जुलै रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात आरोपी भोवड याने ५० हजार रूपयांची लाच घेत असता त्याला ताब्यात घेतले. येथील शहर पोलीस ठाण्यात भाेवड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक महेश तरडे, गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा प्रमुख, रत्नागिरी विभागाचे पोलीस निरीक्षक अनंत कांबळे (अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक, रत्नागिरी) यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस फाैजदार संदीप ओगले, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर यांनी हा सापळा यशस्वी केला.

आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील कार्यालयाकडे संपर्क करावा. किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.- अनंत कांबळे (अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणRatnagiriरत्नागिरी