रत्नागिरी : अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धा वास्को येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या कराटे संघाला १९ सुवर्ण, ८ रौप्य, १२ कांस्य पदके मिळून ३९ पदके मिळाली आहेत. वर्ल्ड फुना कोशी शोतोकान कराटे आॅर्गनायझेशनतर्फे आयोजित स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.कोटा, फाईट, टीम काटा प्रकारात खेळाडूंनी यश मिळविले. रत्नागिरी कराटे संघाचे एकूण २६ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. काटा प्रकारात पाच वर्षांखालील गटात योगेंद्र तावडे (कास्य), सात वर्षांखालील गटात मोहम्मद जाहीद मेहबूब मालगुंडकर (कास्य), आठ वर्षांखालील गटात अनिश खानविलकर (सुवर्ण), नऊ वर्षांखालील गटात युनूस मेहबूब मालगुंडकर (कांस्य), दहा वर्षांखालील गटात सार्थक काणे (रौप्य), तर टीम काटा प्रकारात (सुवर्ण), अकरा वर्षांखालील गटात विश्वजीत सामंत, काटा व टीमकाटा प्रकारात (सुवर्ण) व अव्दैत करमरकर व काटा प्रकारात (रौप्य), बारा वर्षांखालील गटात सागर कांबळे काटा व टीम काटा प्रकारात (सुवर्ण), तेरा वर्षांखालील गटात चैतन्य केतकर काटा (रौप्य) व टीमकाटा (सुवर्ण), पंधरा वर्षांखालील गटात अनिकेत नेरकर काटा (कांस्य), टीम काटा प्रकारात (सुवर्ण), सोळा वर्षांखालील गटात प्रथमेश भितळे काटा (सुवर्ण), छगन रायका (कांस्य), फाईट (कास्य), अठरा वर्षांवरील गटात सूर्यकांत बावकर याने काटा (रौप्य), फाईट (रौप्य) व टीम काटा प्रकारात (सुवर्णपदक) मिळविले.मुलींच्या सहा वर्षांखालील गटात मृदुला पाटील काटा (रौप्य), नऊ वर्षांखालील गटात ऋचा करमरकर काटा (कांस्य), दहा वर्षांखालील गटात पार्थवी बांदिवडेकर काटा (रौप्य), अकरा वर्षांखालील गटात संपदा गवळी काटा (रौप्य) व टीम काटा (सुवर्ण), कश्मिरा तावडे काटा व टीमकाटा (सुवर्ण), भक्ती केतकर काटा (सुवर्ण), आस्था आठल्ये काटा (कांस्य), तेरा वर्षांखालील गटात सोनाली गोगटे काटा (कांस्य) व टीम काटा (सुवर्ण), चौदा वर्षांखालील गटात योजना बोरकर काटा व फाईट (कास्य), टीम काटा (सुवर्ण), पंधरा वर्षांखालील गटात गौरी गोगटे काटा व फाईट (कांस्य), टीम काटा (सुवर्ण), सोळा वर्षांखालील गटात स्वामिनी चव्हाण काटा (रौप्य) पदक मिळविले. यशस्वी सर्व खेळाडूंना प्रशिक्षक राजू गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)रत्नागिरी कराटे संघाचे एकूण २६ खेळाडू स्पर्धेत सहभागी.अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धा वास्को येथे पार.कोटा, फाईट, टीम काटा प्रकारात खेळाडूंनी मिळवले यश.यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव.
राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीला १९ सुवण
By admin | Updated: November 12, 2014 23:32 IST