शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील माभळेत भरदिवसा बिबट्या-डुकराच्या झुंजीचा थरार, बघ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:08 IST

 रेड्यांच्या व बैलांच्या झुंजी या सर्वश्रुत आहेत. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील माभळे - काष्टेवाडी येथे बिबट्या व रानडुकरांमध्ये झालेली झुंज मात्र अपवादानेच दिसली.

रत्नागिरी/देवरूख, दि. 11 -  रेड्यांच्या व बैलांच्या झुंजी या सर्वश्रुत आहेत. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील माभळे - काष्टेवाडी येथे बिबट्या व रानडुकरांमध्ये झालेली झुंज मात्र अपवादानेच दिसली. या अनोख्या झुंजीमध्ये डुकराने बिबट्याला चारीमुंड्या चित केले. विशेष म्हणजे या झुंजीचा थरार भरदिवसा व मानवी वस्तीत घडल्याने ही झुंज बघण्यासाठी माभळे काष्टेवाडीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. रानटी प्राण्यांमधील भरवस्तीत झालेली झुंज ही तालुक्यातील अनोखी अशी पहिलीच घटना आहे. माभळे गावात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या हा बिबट्या मानवी वस्तीत येऊन ग्रामस्थांना दर्शन देत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी गावातील एका ग्रामस्थाच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने ठाण मांडले होते. त्यामुळे ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास कचरत आहेत. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास गावातील काष्टेवाडीजवळील भरवस्तीत असणा-या रस्त्यावरून एक रानडुक्कर आपल्या पिल्लांसह जात असताना दबा धरून बसलेल्या या बिबट्याने पिल्लांच्या कळपातील एका पिल्लावर जोरदार हल्ला चढविला. त्यामुळे घाबरलेली पिल्ले सैरावैरा पळून गेली. आपल्या पिल्लांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने चवताळलेल्या रानडुकराने बिबट्यावर प्रतिहल्ला चढवला. बिबट्या आणि रानडुक्कर यांच्यामध्ये बराच वेळ ही सुरू होती. भरदिवसा व मानवी वस्तीत बिबट्या आणि रानडुकराची अनोखी झुंज लागल्याचे वाडीतील ग्रामस्थांना कळताच ही झुंज पाहण्यासाठी ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. गावातील अनेकांनी या झुंजीचा आनंद लुटला. अखेर या झुंजीत रानडुकराने बाजी मारत बिबट्याला पिटाळून लावले. तत्पूर्वी बिबट्याने रानडुकराच्या पिल्लावर हल्ला केला होता. या हल्ल्यातून बचावलेल्या व गंभीर जखमी झालेल्या या पिल्लाला ग्रामस्थांनी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. झुंज सुटताच काही वेळातच या पिल्लाने आपला प्राण सोडला.

डोळे पाणावले...आपल्या डोळ्यादेखत इवल्याशा पिलाने प्राण सोडल्याने  ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. दरम्यान, बिबट्या व रानडुकराच्या अनोख्या झुंजीची चर्चा माभळे गावात दोन दिवस सुरू होती. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.