शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

राज्य वक्तृत्व स्पर्धेत रसिका जोशी प्रथम

By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST

शिक्षण मंडळ, कऱ्हाडतर्फेयशवंत व्यासपीठ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

चिपळूण : शिक्षण मंडळ, कऱ्हाडतर्फे घेण्यात आलेल्या यशवंत व्यासपीठ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व स्व. शेठ व रा. कि़ लाहोटी कथाकथन स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलची रसिका प्रमोद जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. कऱ्हाड येथे सोमवार व मंगळवारी या स्पर्धा अतिशय उत्साहात व मोठ्या प्रतिसादात झाल्या. या दोन्ही स्पर्धांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी दुपारी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक शंकराप्पा संसुद्दी यांच्या हस्ते रसिकाला प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम देऊन टाळ्यांच्या कडकडाटात गौरविण्यात आले. आठवी ते दहावी या गटाच्या वक्तृत्व स्पर्धेत रसिका जोशी हिने ४१ स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावून कायमस्वरुपी ढाल, चषक व रोख पारितोषिक मिळविले. रसिकाने निसर्ग एक थोर शिक्षक या विषयावर आपले विचार मांडले. या विषयाची उत्तम मांडणी, अचूक शब्दफेक, सुंदर सादरीकरण, वेळेचे अचूक नियोजन यामुळे परीक्षक भारावले. परीक्षक डॉ. श्रीपाद कुलकर्णी, डॉ. अनुराधा कुलकर्णी व शहा यांनी तिचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेसाठी तिला युनायटेड इंग्लिश स्कूलचे शिक्षक अजित चव्हाण, मुग्धा बर्वे, रसिकाचे वडील प्रमोद जोशी व आई गद्रे ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. संगीता जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. याआधीही याच ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सलग ३ वर्षे तिने पारितोषिक पटकावले आहे. अनेक ठिकाणी वक्तृत्व, कथाकथन व काव्य वाचन स्पर्धेत ती विजयी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, युनायटेडचे मुख्याध्यापक कृष्णाजी शिंदे, उपमुख्याध्यापक पाटील, पर्यवेक्षक सपाटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींसह रसिकाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)