शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही : राणे

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

टेरव वेतकोंडवाडी येथील पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी

चिपळूण : मतदार संघातील विकासकामे आम्ही करायची, राज्य व केंद्र शासनामार्फत कोट्यवधीचा विकासनिधी आणायचा आणि त्यांनी श्रेय घ्यायचे. त्यामुळे अशा खासदाराला व आमदारांना जाब विचारा. येथील आमदारांनी पाच वर्षात कोणते काम केले? कोणाला नोकरीला लावले? कोणता उद्योग आणला? असा प्रश्न करून आम्ही जनतेसाठी झटत आहोत, याची सर्वांनी जाणीव ठेवा. येथील जनतेला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन माजी खासदार नीलेश राणे यांनी दिले.टेरव वेतकोंडवाडी येथील पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत, बंटी वणजू, रामदास राणे, विलास खेराडे, प्रभाकर जाधव, दादा बैकर, खेर्डीचे सरपंच नितीन ठसाळे, पंचायत समिती सदस्या ऋचा म्हालीम, शिवराम पंडव उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम व आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वेतकोंडचा रखडलेला रस्ता येथील आमदार का करू शकले नाहीत. निधी आम्ही आणायचा आणि श्रेय यांनी घ्यायचे काय? हा कुठचा न्याय? आम्ही जनतेसाठीच झटत असतो, याची जाणीव ठेवा. विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू. जी चूक लोकसभेच्या निवडणुकीत केलीत, ती विधानसभेत करू नका. निकम यांच्या पाठिशी राहा, आम्ही सर्व आपले प्रश्न निश्चितपणे सोडवू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम म्हणाले की, एक खासदार म्हणून गावागावात, वाडीवस्तीत फिरणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून राणे यांची ओळख आहे. येथील जनतेने एक धावणारा खासदार पाहिला. त्यामुळे पुढील पाच वर्षांनंतर राणे हेच पुढचे खासदार असतील, असा आपला विश्वास आहे. कारण काम करणाऱ्या माणसाला यश मिळत असते. याप्रसंगी वेतकोंडवाडी ग्रामस्थांतर्फे राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला एकनाथ माळी, विलास तांबे, बबन पंडव, प्रकाश साळवी, प्रदीप उदेग, सुहास मोहिते व वेतकोंड ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)