शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रायपाटण सरपंचांवर बहुमताचा ‘अविश्वास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 23:56 IST

आठविरूध्द एक : गांगण यांनी पद गमावले

राजापूर : संपूर्ण तालुक्याचे नजरा लागून राहिलेल्या रायपाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा अशोक गांगण यांच्या विरोधातील शिवसेनेच्याच आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आठ विरुध्द एक मताने मंजूर झाला. त्यामुळे गांगण यांना आपले पद गमवावे लागले.गेले काही दिवस राजापुरात रायपाटण सरपंच अविश्वास ठरावाचा विषय गाजत आहे. राजापूरचे तहसीलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितीत हा निर्णय लागला. रायपाटणचे सरपंचपद ओबीसी महिला राखीव असल्याने आता नूतन सरपंचपदी कोणाची नियुक्ती होते, याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे.कोणत्याही विकासकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशा अनेक कारणांनी रायपाटणच्या सरपंच सीमा गांगण यांच्याविरोधात सेनेच्याच आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.हा ठराव उपसरपंच राजेश नलावडे यांनी मांडला, त्याला उर्वरित सदस्यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावाची दखल घेऊन तहसीलदार भालेराव यांनी रायपाटणमध्ये विशेष सभा आयोजित केली होती. त्यामध्ये अविश्वास ठरावावर चर्चा झाली व तहसीलदारांच्या आदेशानुसार दाखल ठराव मतदानाला टाकण्यात आला. गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले.यावेळी सरपंच गांगण यांच्याविरोधात आठ सदस्यांनी मतदान केले. गांगण यांना फक्त स्वत:चे मत पडले. त्यामुळे अविश्वासाचा हा ठराव मंजूर झाला. या ठरावाला आव्हान देण्यासाठी सरपंच गांगण यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर गावच्या सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंचांकडे दिला जाईल. रायपाटणच्या सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल झाल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदी कोणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)