शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

रमेश कदम यांनी राष्ट्रवादी संपविली

By admin | Updated: April 6, 2015 01:31 IST

तानाजी चोरगे : जिल्हा बँक निवडणुकीतील वातावरण तापले, आरोप प्रत्यारोप सुरू

चिपळूण : जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. रमेश कदम हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपल्याच पक्षाच्या बँकेबाबत आरोप करताना आपण या बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे पुढे काय काय झाले ते जनतेला सांगा. ज्यांनी बँकेकडून लाभ घेतला त्यांनी बँकेवर बोलू नये. त्यांनी चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी संपवून आता बँकेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लावताना २० लाख रुपये संचालकांनी घेतले, असा आरोप कदम यांनी केला होता. कदम यांना वर्षभरांनी साक्षात्कार झाला. यापूर्वी अनेकांनी अनेक आरोप केले. पण एकानेही पुरावा दिला नाही. आता वर्षभरानंतर त्यांचा कोण तरी घेतला नाही म्हणून यांना जाग आली आहे. बँकेत १२ ते १५ हजार पगार मिळणारा कर्मचारी २० लाख रुपये कसा फेडणार? याचे व्याज ३ लाख रुपये होते. आयुष्यभर नोकरी करुनही २० लाख फिटणार नाहीत. बँकेची निवडणूक आली म्हणून यांना हे उद्योग सुचले आहेत. इतरांवर आरोप करताना स्वत:चा इतिहास पाहावा. इतकेच काय तर तक्रारदाराला घेऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी दाखल करावी. पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी व बदनामी कशासाठी? कोणी सुपारी तर दिली नाही ना? असा संशय चोरगे यांनी व्यक्त केला आहे. बँक प्रगतीपथावर आहे असे नाबार्ड, सहकार खाते सांगते. लेखी आॅडीट आहे. बँकेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. सीबीएस आहे. एटीएम बसवणे सुरु आहे. एलपीए शून्य आहे. १४०० कोटीपर्यंत ठेवी आहेत. ८५० कोटींचे कर्ज दिले आहे. असे असताना माजी आमदार कदम यांनी नोकरीत घ्या म्हणून जी चार नावे सुचवली ती नापास झाली. त्याला बँक संचालक काय करणार? ऐन निवडणुकीच्या तोंडावर संचालकांना व बँकेला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. बदनामी करण्यापेक्षा सबळ पुरावा घ्या व गुन्हा दाखल करा. आपल्याच पक्षाच्या लोकांवर आरोप करुन पक्ष नाहीसा करण्याचे काम सुरु आहे हे खेदजनक आहे. भैरीसमोर उभे राहून फुल उचलून खोटे बोलणारे भैरीने पाहिले आहेत त्यापेक्षा गुन्हाच दाखल करा. बँकेची प्रगती झाली की नाही हे जनतेला कळेल, असे आव्हान चोरगे यांनी दिले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत माजी आमदार कदम विरूध्द चोरगे असा संघर्ष सुरू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)