शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत : वैभव खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

खेड : रामदास कदम यांना शिवसेनेत किंमत राहिली नसल्याने आपल्या माणसांना पुढे करून स्वतःचे सरकार अस्थिर करण्यासाठी काम ...

खेड : रामदास कदम यांना शिवसेनेत किंमत राहिली नसल्याने आपल्या माणसांना पुढे करून स्वतःचे सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्याबाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला, असा आरोप वैभव खेडेकर यांनी खेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यामुळे आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही खेडेकर यांनी केला आहे.

वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी आणि त्यांचीही ईडीमार्फत चौकशी लावावी, असे आवाहनही खेडेकर यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टबाबत अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचे म्हटले आहे. हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बेहिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांना दिलेली सर्व माहिती प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागवून ती माहिती रामदास कदम यांनी त्यांचे मित्र भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे दिली. सोमय्या हे खरोखर भ्रष्टाचाराविरोधात लढत असतील तर त्यांनी रामदास कदम यांचीही ईडीमार्फत चौकशी लावावी, असे आपले त्यांना आवाहन आहे, असे खेडेकर म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, माझ्याविरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली, ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली. रामदास कदम यांनी ती किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी आपल्याविरोधात कट रचला आहे. मी लढवय्या आहे. गेली पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली, याची ईडीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणापासून दूर करण्याचा कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, असे आव्हान खेडेकर यांनी दिले.

खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत आपण केलेल्या कामामुळे व विकास कामे यामुळे जनता आपल्यासोबत आहे. दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्यासोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.