शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

राजापूरची उद्याने स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

उद्यानांचा प्रश्न : नगरपरिषद लक्ष देत नसल्याने नाराजी

राजापूर : राजापूर शहरात असणारी बालोद्याने व पिकनिक स्पॉट विकासाबरोबरच स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असून, गेल्या दोन वर्षांत यावर खर्च झालेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर नगरपरिषदेने गेल्या दोन वर्षांच्या काळात शहरातील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान, कोंढेतड येथील महंमदसाहेब बालोद्यानावर तसेच रानतळे येथील पिकनिक स्पॉटवर लाखो रुपये खर्च केले असले तरी आज या उद्यानांची अवस्था बिकट आहे.शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत देणारी राजापूर नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत स्वत:च मोठ्या प्रमाणावर उदासिन आहे. शहरात असणारी उद्याने व पिकनिक स्पॉट सद्यस्थितीत कचऱ्याची आगारे बनली आहेत. रानतळे येथील पिकनिक स्पॉट तर गेले अनेक महिने साफ न केल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कारंज्यामध्ये पाण्याचा तुटवडा व त्याच्या स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या पिकनिक स्पॉटकडे शहरवासीयांनी पाठ फिरवली आहे.तसेच शहरातील साई मंदिरजवळील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान व कोंढेतड येथील महमदशेठ बालोद्यानावर गेल्या दोन वर्षांत राजापूर नगर परिषदेने सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही उद्याने लहान मुलांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहेत. या दोन्ही उद्यांनावर नगर परिषदेने खरोखरच सुशोभिकरणासाठी खर्च केला का, असा प्रश्न या उद्यानांमध्ये गेल्यावर पडल्यावाचून राहात नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात या उद्यानांवर खर्च झालेले लाखो रुपये नेमके कशावर खर्च झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला असून, नगर परिषदेने जनतेचा पैसा स्वत:च्या फायद्यासाठीच वापरल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.एकीकडे शासनाकडून आलेला निधी खर्ची घालायला पाहिजे म्हणून खर्च करायचा. त्यातून आपले अर्थपूर्ण व्यवहार साधायचे, असा नवा फंडा राजापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहरातील सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली असून, शहरातील उद्याने व पिकनिक स्पॉट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहेत. उद्यानांना नगर परिषदेने स्वच्छतेचा साज चढवून ती खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)