शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

राजापुरात चिठ्ठी शिवसेनेला पावली

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

जिल्ह्यातील उर्वरित आठही तालुक्यांत सभापतीच्या अपेक्षेप्रमाणेच निवडी झाल्या.

रत्नागिरी : राजापूर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत समसमान मतदान झाल्याने अखेर चिठ्ठीचा वापर झाला व त्यामध्ये नशिबाने साथ दिल्याने दोन्ही पदी शिवसेनेचे सदस्य विजयी झाले. जिल्ह्यातील उर्वरित आठही तालुक्यांत सभापतीच्या अपेक्षेप्रमाणेच निवडी झाल्या.राजापुरात अडीच वर्षे शिवसेनेला साथ दिलेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत काँग्रेसशी घरोबा केला. त्यामुळे शिवसेना आणि आघाडी यांच्या सभापती पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीचा प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेच्या सोनम बावकर यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे उपसभापती निवडीच्यावेळीही हाच गोंधळ झाला आणि त्याहीवेळेस चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. या पदावर उमेश पराडकर यांची वर्णी लागली. नऊही तालुक्यांत सभापतीच्या निवडी अपेक्षेप्रमाणेच झाल्या. या निवडणुकीत तरुण सभापती होण्याचा मान शिवसेनेच्या दीपाली दळवी यांना मिळाला. त्या लांजाच्या सभापती झाल्या. रत्नागिरीतील सभापतिपदासाठी युतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने या निवडीत चुरस निर्माण केली होती. शिवसेनेतर्फे प्रकाश साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच रात्री उशिरा नदीम सोलकर यांचे सभापतिपदासाठी शिवसेनेकडून नाव निश्चित केले होते़ मात्र, पुन्हा साळवी यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. (प्रतिनिधी)तालुकासभापतीपक्षरत्नागिरीप्रकाश साळवीशिवसेनायोगेश पाटीलभाजपमंडणगडवैशाली चोरगेशिवसेनाआदेश केणेशिवसेनादापोलीगीतांजली वेदपाठकशिवसेनाउन्मेश राजेशिवसेनाखेडचंद्रकांत कदमशिवसेनारवींद्र मोरेशिवसेनागुहागरराजेश बेंडलराष्ट्रवादीसुरेश सावंतराष्ट्रवादीचिपळूणसमीक्षा बागवेराष्ट्रवादीसुचिता पवारराष्ट्रवादीसंगमेश्वरमनीषा गुरवशिवसेनासंतोष डावलशिवसेनालांजादीपाली दळवीशिवसेनाआदेश आंबोळकरशिवसेनाराजापूरसोनम बावकरशिवसेनाउमेश पराडकरशिवसेना