शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोकण आणि चिपळूणच्या पर्यावरणविषयक समस्यांवरील उपाययोजनांची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या माध्यमातून सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीने घेतला आहे.

पर्यावरण जागरूकता वाढू लागल्याने त्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१० साली राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) ही विशेष न्याययंत्रणा स्थापन केली आहे. ‘एनजीटी’च्या अधिकार कक्षेत प्रामुख्याने जलप्रदूषण कायदा-१९७४, वनसंवर्धन कायदा-१९८०, वायुप्रदूषण कायदा-१९८१, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६, सार्वजनिक दायित्व विमा कायदा-१९९१ आणि जैविक विविधता कायदा-२००२ अंतर्गत कोकण व चिपळूणशी संबंधित असलेल्या समस्यांवर दाद मागितली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकणच्या समस्या कायदेशीर पद्धतीने मांडत असल्याबद्दल ॲड. ओवेस पेचकर यांचा ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि.च्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्लोबल चिपळूणचे चेअरमन श्रीराम रेडीज, मनोज गांधी, धीरज वाटेकर, विश्वास पाटील, प्रल्हाद लाड, विलास महाडिक उपस्थित होते.

यावेळी चेअरमन श्रीराम रेडीज म्हणाले की, सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरावामुळे हा जणू चेक डॅम बनला आहे. कोकणात सर्वत्र दरडी कोसळताहेत. महामार्गाचे सर्वेक्षण करताना इथल्या नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास विचारात घेतला होता का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. महामार्गाला असलेली वळणे, चिपळूणजवळ कामथे, परशुराम आदी घाटातील डोंगरात गरज नसताना केलेल्या अनावश्यक भरावांची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाळी स्थिती पाहता चिपळूणनजीकचा परशुराम घाट भविष्यात वन वे करावा लागेल अशी दाट शक्यता आहे. त्याचा विचार आत्ताच करायला हवा आहे.