शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही खेंड भागात टंचाई

By admin | Updated: July 22, 2014 22:49 IST

पाणी रे पाणी : २४ सदनिकाधारकांची वणवण

चिपळूण : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी शहरातील खेंड परिसरात असणाऱ्या एका सदनिकेमधील २४ कुटुंबीयांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे प्रश्न मांडूनही गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे या सदनिकेतील रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खेंड भागात सिल्व्हर पॅलेस सदनिकेत २४ कुटुंबीय राहात आहेत. एप्रिल महिन्यापासून या सदनिकेतील रहिवाशांना पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत येथील महिलांनी नगरपरिषदेवरही धडक देऊन पाणी समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाला विनंती केली. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी येथील सदनिकाधारकांची पाणी समस्या सुटलेली नाही. याबाबत आज (मंगळवारी) येथील काही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रफीक सुर्वे यांची भेट घेतली व चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने अखेर येथील नागरिकांनी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची भेट घेऊन पाणी समस्येचा प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले. सदनिकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने दैनंदिन व्यवहार कसे करायचे, असा सवालही रहिवाशांंनी केला. सुधारित नळपाणी योजना सुरु झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष शाह यांनी दिले. मात्र, तोपर्यंत सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खेंड भागातील पाणी टंचाई तीव्र रूप धारण करीत असल्याने येथील सदनिकाधारकांनी गेले अनेक दिवस पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न चालविले होते मात्र त्या प्रयत्नाना यश आलेले नाही.शहरातील मोठ्या लोकवस्तीच्या भागाला पाणी टंर्चािला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नाराजीवर उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनी लियाकत शहा यांची भेट घेतली व त्याच्याकडून शब्द घेतल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)-चिपळूण शहरातील विकसित होत असलेला भाग म्हणून खेंड भागाकडे पाहिले जात आहे. येथे असणाऱ्या नागरी सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन महिने यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य पालिकेने दाखविले नाही, पाणी पुरवठा विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.चिपळूण नगरपालिकेच्या पाणी विभागाकडे २४ सदनिकाधारकांनी आजपर्यंत अनेक वेळा संपर्क साधला व पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील खेंड भागात नागरिकांनी पावसात पाण्यासाठी वणवण करणे, हे क्लेषदायक असल्याची प्रतिक्रिया तेथून व्यक्त करण्यात आली.