शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जातात. मात्र, हल्ली पाऊस लहरी झाला आहे. यंदा सातत्याने सुरू असलेल्या वादळांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. यंदा जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सलग काही दिवस अतिवृष्टीमुळे चार महिन्यांची सरासरी सव्वातीन महिन्यातच पावसाने ओलांडली आहे.

२००५ सालापासून कोकणात अतिवृष्टी होत असून, दरड कोसळणे, रस्ते, भूभाग खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत. सध्या पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. कधी सरासरीपेक्षा अतिशय कमी तर कधी अतिवृष्टीचा कहर सुरू झाला आहे. २०१९ साली २ जुलै आणि २०२१ साली २२ जुलै या दिवशी रत्नागिरीसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने महापूर आल्याने हाहाकार उडाला होता. या दोन्ही साली ऑगस्ट - सप्टेंबर या दोन्हीही महिन्यांमध्ये जोरदार पडलेल्या पावसाने चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी या शहरांबरोबरच तालुक्यांमधील अन्य भागात पाणी भरण्याच्या घटना घडल्या होत्या. घरांमध्ये, शेतीमध्येही पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा जूनपासूनच पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू झाली. जुलै महिन्यातही लक्षणीय पाऊस झाला. मात्र, ऑगस्टपर्यंत जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या निम्म्यापेक्षाही पाऊस कमी झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात केवळ ४६० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात ७ आणि ८ तारखेला झालेल्या अतिवृष्टीने या दोन दिवसांतच २६३.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ८ सप्टेंबरलाच पावसाने ३३६४ मिलिमीटर ही वार्षिक सरासरीचा रेकाॅर्ड मोडत ३४२५ मिलिमीटरपर्यंत मजल मारली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरअखेर पावसाने ३५७० मिलिमीटरपर्यंत मजल मारली आहे.

सप्टेंबर पावसाचा महिना?

जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यांत पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर जुलैअखेर १८१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जेमतेम ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुन्हा धडाकेबाज सुरुवात केल्याने या महिन्याच्या तेरा दिवसांतच ५३७.६४ मिलिमीटरची मजल मारली आहे. सप्टेंबर महिन्यात ४७० मिलीमीटर पाऊस पडणे अपेेक्षित असते. मात्र, आतापर्यंतच एवढा पाऊस झाला असून, हवामान खात्याने अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरणार आहे.